Gift for Girlfriend, Camel, Baby Camel, Dubai,arrested 
ग्लोबल

गर्लफ्रेंडसाठी कायपण! बर्थडे गिफ्ट देण्यासाठी उंटाच्या 'बेबी'ला पळवलं

सकाळ ऑनलाईन टीम

प्रेमासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. बॉलिवूडमधील चित्रपटांनी प्रेमाची अशी काहीतरी विचित्र फ्रेम सेट केल्याचेही दिसून येते. दुबईत एका बॉयफ्रेंडने अफलातून धाडस केल्याची घटना उघड झाली आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी  चक्क  मिलयन डॉलरच्या प्रजातीच्या  उंटांच्या पिल्लाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दुबईतील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गर्लफ्रेंडला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी एकाने महागड्या आणि दुर्मिळ प्रजातीच्या उंटाच्या पिल्लाची चोरी केली. त्याची ही चोरी पकडली गेल्याने त्याला अटक करण्यात आली.   

या महिन्याच्या सुरुवातीला महागड्या प्रजातीच्या उंटाचे पिल्लू चोरीला गेल्याची तक्रार संबंधीत मालकाने पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर दुबई पोलिसांनी पिल्लाचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यानअमिरातमधील एका व्यक्तीने पोलिस अधिकाऱ्यांना फर्म हाऊसच्या 3 किमी परिसरात उंटांचं पिल्लू भटकत असताना आढळले, अशी माहिती देत पिल्लू आपल्याकडे असल्याचे सांगितले.  

उंटाचं पिल्लू इतक्या लांब जावू शकत नव्हते. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.  ज्यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली त्यावेळी तो खोटे बोलत असल्याचे उघड झाले. त्याने गर्लफ्रेंडला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी दुर्मिळ प्रजातीच्या उंटाच्या पिल्लाची चोरी केली होती, अशी कबुली दिली.

पोलिसांनी तपास वेगाने सुरु केल्यानंतर त्याच्या मनात भीती निर्माण झाली होती. आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने तो स्वत: पोलिस अधिकाऱ्यांना उंटांचे पिल्ले सापडल्याचे सांगत होता. पण त्याने जी कहाणी रचली होती. ती तर्कशुद्ध नव्हती त्यामुळे त्याची चोरी पकडली गेली. पोलिसांनी संबंधित उंटाच्या पिल्लाला त्याच्या मालकाच्या स्वाधीन करत चोरट्याला अटक केले आहे. स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार या दुर्मिळ उंटाची किंमत मिलीयनच्या घरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT