मिली बॅनर्जी
मिली बॅनर्जी 
ग्लोबल

'ब्रिटीश पोलिसिंग'च्या प्रमुखपदी भारतीय वंशाची उद्योजिका

वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनच्या कॉलेज ऑफ पोलिसिंग कॉलेजच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या उद्योजिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. मिली बॅनर्जी असे या 71 वर्षीय उद्योजिकेचे नाव असून, त्यांचा जन्म कोलकता येथे झाला होता. ब्रिटीश पोलिस समितीचे व्यावसायिक पातळीवर कामकाजाचे निरिक्षण करणे आणि अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान याच्या चाचण्या घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

'पोलिस नेहमी दाखवत असलेल्या शौर्य आणि समर्पणासाठी आम्ही आवश्यक ते उत्तम ज्ञान आणि कौशल्य पुरवू. आमच्याकडे काही महत्वाकांक्षी योजना आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य मदत होईल यासाठी मी एक व्यावसायिक संघटन करुन अशा लोकांबरोबर काम करण्याचे ठरविले आहे,' असे मत बॅनर्जी यांनी या नियुक्तीनिमित्त बोलताना व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी माइक कनिंगहॅम यांच्याबरोबर करण्यात आलेली बॅनर्जी यांची नियुक्ती संघटनेच्या व्यावसायिक धोरणास मदतशील ठरेल, असे ब्रिटीश सरकारने म्हटले आहे. तर ब्रिटीश गृहसचिव अंबर रुड यांनी बॅनर्जी यांच्यासोबत काम केल्याच्या अनुभवावरुन  गेल्या वर्षी पासून मिली यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फार चांगला होता, असे मत व्यक्त केले. ब्रिटीश वाहतुक पोलिस यांच्यासह सार्वजनिक आणि व्यावसायिक संघटना यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कामाने मी प्रभावित झालो असल्याचेही ते बोलले. तर खाजगी आणि सार्वजनिक विभागातील कामांसह पोलिस खात्यातील कामांचाही मिली यांना उत्तम अनुभव घेतला असल्याचे पोलिसींग कॉलेजचे सीईओ राशेल टफीन म्हणाले.    

ब्रिटनमधील खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात दीर्घ आणि विविध प्रकारची कारकीर्द असणाऱ्या बॅनर्जी यांना नागरी सेवा क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल 2002 मध्ये क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून सी.बी.ई.ने सन्मनित केले होते. त्या सात वर्षे ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिस अथॉरेटीत कार्यरत होत्या. तसेच यूके केबिनेट कार्यालयाच्या  अकार्यकारी संचालक, प्रिझन्स बोर्ड, पीबॉडी ट्रस्ट आणि मिडिया वॉचडॉग ऑफकॉम यांसारख्या अनेक अकार्यकारी पदांवर देखील त्यांनी काम केले आहे. बॅनर्जी या सध्या ईस्ट लंडन एन.एच.एस. फाउंडेशन ट्रस्ट च्या बोर्ड सदस्य व एन.एच.एस. रक्त आणि प्रत्यारोपण खात्यावर कार्यरत आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT