ग्लोबल

विजय मल्ल्याचा कांगावा, म्हणे भारतात जिवाला धोका 

पीटीआय

लंडन : भारतामध्ये जिवाला धोका असल्याची शंका मद्यसम्राट विजय मल्ल्या याने वेस्टमिनिस्टर न्यायालयात व्यक्त केली. मल्ल्याच्या वकिलांनी याबाबत बाजू मांडताना मल्ल्याला भारतात धोका असून, मल्ल्यावर लावलेले आरोप हे खोटे व आधारहीन असल्याचेही म्हटले. दरम्यान, मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या सुनावणीवर वेस्टमिनिस्टर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. 4 डिसेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची सुनावणी न्यायालयात होणार आहे. 

भारत सरकारने या आधीच मल्ल्याच्या सुरक्षेचा विश्‍वास वेस्टमिनिस्टर न्यायालयाला दिला आहे. तसेच, भारतातील सुरक्षा यंत्रणांनीही कारागृहांची तपासणी केली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, तरीही मल्ल्या प्रत्येकवेळी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सुनावणीला विलंब लावत आहे. भारत आणि ब्रिटनदरम्यान 1992 मध्ये प्रत्यार्पणासंदर्भात आंतरराष्ट्रीय करार झाला होता. या करारांतर्गत आतापर्यंत एक प्रत्यार्पण झाले आहे. 

याआधी विजय मल्ल्याने भारतातील तुरुंगांची अवस्था वाईट असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याचवेळी भारताने विजय मल्ल्याला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येईल, असे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानंतरही मल्ल्याचा कांगावा सुरूच राहिला. 

विजय मल्ल्यावर भारतातील निरनिराळ्या बॅंकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज आहे. बॅंकांचे कर्ज चुकवण्याऐवजी विजय मल्ल्या देश सोडून पळाला. 2016 पासून मल्ल्या लंडनमध्ये आहे. भारत सरकारने ब्रिटन सरकारकडे मल्ल्याच्या प्रत्यापर्णासंदर्भात विनंती अर्ज केला होता. भारताच्या मागणीनंतर लंडन प्रशासनाने विजय मल्ल्याला रेड कॉर्नर नोटीस बजावत अटकही केली होती. मात्र, त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. 

अशी होईल सुनावणी 
मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी 4, 5, 6, 7, 11, 12, 13 आणि 14 डिसेंबर या तारखांना होईल. 4 डिसेंबरला सुनावणीला सुरवात होईल, तर 14 डिसेंबरपर्यंत या खटल्याचा निकाल अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT