ग्लोबल

'मी मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नाही; त्याच्या संपत्तीत मला काडीचाही रस नाही'

विनायक होगाडे

नवी दिल्ली : हजारो कोटींचा चूना लावून भारतातून फरार झालेला मेहुल चोक्सी सध्या डोमिनिका देशाच्या तुरुंगात कैद आहे. तर दुसरीकडे मिस्ट्री गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेली चोक्सीची गर्लफ्रेंड बार्बरा जाबरिकाने आता पहिल्यांदा आपलं तोंड उघडलं आहे. जाबरिकाने मेहुलचं अपहरण केल्याच्या अफवांचं खंडन करुन म्हटलं की, अपहरण करण्याचा काही अर्थच होत नाही. तो नातं बनवण्यासाठी म्हणून हॉटेल बूक करणे, फ्लाइटचे तिकीट काढणे या अशा ऑफर्स द्यायचा. मात्र, मी त्याचे सगळे प्रस्ताव धुडकावून लावले आहेत.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड बार्बरा जाबरिकाने म्हटलं की, मी हे अनेक मुलाखतीत सांगितलंय की, मी त्याची गर्लफ्रेंड नव्हते तसेच आमच्यात तसं काहीही नव्हतं. मी स्वत: कमावते आणि माझा स्वत:चा बिझनेस आहे. मला त्याच्याकडून कसल्याही पैशांची, आधाराची हॉटेल बुकींगची, खोट्या दागिन्यांची अथवा अशा कोणत्याही गोष्टींची गरज नाहीये. तसेच तिच्याशी कुणीही संपर्क केला नाहीये. त्यामुळे अपहरणाला काही अर्थच उरत नाही. बार्बराच्या म्हणण्यानुसार, जे लोक जॉली हार्बर क्षेत्राला ओळखतात, त्यांच्यासाठी ते एक सर्वांत सुरक्षित स्थान आहे. याठिकाणी कुणाचंही अपहरण होणं अवघडच नव्हे तर अशक्य आहे. बार्बराने म्हटलंय की, तिला मेहुलच्या संपत्तीत अथवा पैशांमध्ये कसलाही इंटरेस्ट नाहीये.

मेहुलच्या मागण्यांना नाकारलं

बार्बरा जाबरिकाने दावा केलाय की, ती चोक्सीसोबत नेहमी कॉफी पिणे, सायंकाळी फिरायला जाणे आणि डिनरला देखील जायची. बार्बराने हे देखील म्हटलंय की, चोक्सीने आपलं नाव राज असं सांगितलं होतं तसेच त्याच्या आसपासचे सगळेच जण त्याला याच नावाने पुकारायचे. बार्बराने म्हटलंय की, चोक्सीने तिला हॉटेल बुक करण्याचा तसेच फ्लाईटचे तिकीट काढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तिने तो नाकारला होता. कारण यामुळे आशा वाढल्या असत्या आणि जगाला ते चुकीचं वाटलं असतं. ती चोक्सीसोबत फक्त एका मैत्रीत राहू इच्छित होती.

बिझनेसचा दिला होता प्रस्ताव

एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलंय की, या वर्षी मे महिन्यात चोक्सीने माझ्यासोबत बिझनेस करण्यासाठीचा प्रस्ताव दिला होता, कारण त्याला माहिती होतं की, मी प्रॉपर्टीशी निगडीत काम करते. तो अँटीग्वामध्ये बुटीक, हॉटेल आणि क्लब उघडू इच्छित होता तसेच त्याने यासाठी फंड देण्याचीही तयारी दर्शवली होती. तो सहा महिन्यांमध्ये 6 ते 8 नंबर बदलायचा. तो नेहमीच मला राज बनून मॅसेज करायचा. अँटीग्वाचे अनेक लोक आणि रेस्त्रांचा स्टाफ देखील त्याला राज नावानेच बोलवायचे. कुणालाही त्याचं खरं नाव माहिती नव्हतं.

पत्नीने लावला होता अपहरणाचा आरोप

मेहुल चोक्सीला अँटीग्वा पोलिसांनी जॉली हार्बरमधून अटक केली होती. त्याच्या अटकेवेळी आठ ते दहा लोक उपस्थित होते. मेहुल आणि त्याची पत्नी प्रीतीने आरोप लावलाय की गर्लफ्रेंड बार्बराने त्याचं अपहरण केलं आहे. मेहुल चोक्सीला अँटीग्वातून डोमिनिकामध्ये अवैध प्रवेश केल्या प्रकरणी अटक केली गेली होती. मेहुलने आरोप केला होता की, पोलिस आणि इतर लोकांनी त्याला मारहाण केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या मतदार यादीचे 'क्लिनिंग'! तीस लाखांहून अधिक नावे वगळली, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 22 कॅरेट, 18 कॅरेट अन् 24 कॅरेट सोनं कितीला मिळतंय?

Elon Musk Warning : पृथ्वीवरील लोकांकडे उरली फक्त ५० वर्षे, इलॉन मस्क यांचा गंभीर इशारा... काय आहे अंतराळातील मोठी योजना?

Marathi News Live Updates : मेद्चल-मलकजगिरी जिल्ह्यातील बोलाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६० इलेक्ट्रिक डेटोनेटर्स आढळले

Pune Crime News : पुण्यात खळबळ! भाजप नेत्याच्या गाड्यांवर हल्ला; दगड-बांबूने २ वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड, CCTVच्या वायरही कापल्या

SCROLL FOR NEXT