bill gates 
ग्लोबल

दोन वर्षांपूर्वीच बिल गेट्स यांच्या वैवाहिक जीवनात भूकंप?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- सध्या सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सह-संस्थापक आणि जगातील श्रीमंतापैकी एक बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. मागील आठवड्यात या दोघांनी लग्नाच्या २७ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. नेमकं यांच्या दोघांमध्ये काय बिनसलं याबाबत बरेच तर्कवितर्क लढवण्यात आले. वॉल स्ट्रीट जनरलच्या एका रिपोर्टनुसार, ज्यांच्या घटस्फोटाचे एक महत्त्वाचे कारण लैंगिक अत्याचाराप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या चेफरी (Jeffrey Epstein) एपस्टीन नावाच्या व्यक्तीसोबत बिल गेट्स यांचे असणारे संबंध हे आहे. (Microsoft Bill Gates Melinda Gates divorce reason Ann Winblad Jeffrey Epstein)

वॉल स्ट्रीट जनरलने काही कागदपत्रांच्या हवाल्याने दावा केलाय की, बिल गेट्स आणि एपस्टीन यांचे संबंध ८ वर्षे जूने आहेत. या दोघांची भेट २०१३ मध्ये झाली होती. न्यूयॉर्क टाईम्सने २०१९ च्या ऑक्टोबरमध्ये दावा केला होता की, गेट्स आणि एपस्टीनची भेट अनेकवेळा झाली आहे. इतकंच नाही तर, वृत्तपत्राने दावा केलाय की, एपस्टीन गेट्स यांच्या न्यूयॉर्कमधील घरीही थांबले होते.

बिल गेट्स यांचा मेलिंडा यांच्यासोबत लग्न करण्याआधी एन विनब्लेड (Ann Winblad) नावाच्या महिलेसोबत अफेअर होतं. त्यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. वेगळं झाल्यानंतर बिल गेटस् यांनी मेलिंडासोबत संसार थाटला. असे असले तरी एन आणि बिल एकमेकांना विसरु शकले नव्हते. टाईम मॅगझीनच्या एका आर्टिकलनुसार, बिल गेट्स आणि मेलिंडामध्ये एक करार झाला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की वर्षातून एकवेळा बिल एनसोबत सुट्टीसाठी जाऊ शकतील. यात मेलिंडा यांना कोणतीही तक्रार असायला नको.

मेलिंडासोबत लग्नानंतरही बिल गेट्स दरवर्षी एनसोबत सुट्टीसाठी जात होते. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, दोघे एका बीच हाऊसवर जायचे. याठिकाणी लोकांची गर्दी असायची, पण बिल याची अडवान्स बुकींग करायचे. बिल गेट्स आणि एन विनब्लेड यांचा १९८७ मध्ये ब्रेकअप झाला होता, पण ते एकमेकांना कधीही विसरु शकले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT