turkey 
ग्लोबल

तुर्कीत आर्मीचे हेलिकॉप्टर झाले क्रॅश; एका अधिकाऱ्यासहित 11 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

तुर्की : तुर्कीच्या पूर्व भागात सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. यामध्ये तब्बल 11 सैनिकांचा मृत्यू झाला आहे तर आणखी दोन सैनिक जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. न्यूज रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये एका उच्च स्तरिय अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. हे हेलिकॉप्टर केकमीस नावाच्या गावाजवळ क्रॅश झाले आहे. 

मंत्रालयाने म्हटलंय की गुरुवारी हेलिकॉप्टर बिंगोल प्रांतामधल ततवानच्या दिशेने जात होतं. तेंव्हा दुपारी जवळपास 2.25 मिनिटांनी त्याचा संपर्क तुटला. या दुर्घटनेमध्ये लेफ्टीनंट जनरल ओस्मान इरबास यांचं नाव देखील सामील आहे. या दुर्घटनेबद्दल तुर्कीच्या नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेता डेवलेट बाहसेली यांनी देखील ट्विट केलं आहे. यातील नऊ लोकांचा मृत्यू घटनास्थळीच झाला आहे तर दोघांचा दवाखान्यात मृत्यू झाला आहे. 

या दुर्घटनेमागचं वास्तविक कारण अद्याप समजलं नाहीये. एका स्थानिक चॅनेलनं सांगितलंय की हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झालं आहे. यामागील कारण बर्फवृष्टी आणि धुकं असू शकतं. घटनास्थळाच्या जवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने म्हटलं की त्याने सर्वांत आधी ही दुर्घटना पाहिली. त्याने म्हटलं की, एक व्यक्ती हेलिकॉप्टरच्या खाली होता मात्र त्याच्यावर अधिक दबाव नव्हता. मी त्याच्या तोंडावरील बर्फ हटवला जेणेकरुन तो श्वास घेऊ शकेल. त्याने पुढे म्हटलं की, मी त्याला विचारलं की तो ठिक आहे का? त्याने थोड्या वेळाने तो ठिक असल्याचं सांगितलं. मी बर्फ हटवण्याचं काम सुरु केलं. माझ्या हातांना देखील जखम झाली  पण मी बर्फ हटवण्याचं काम सुरुच ठेवलं. त्यानंतर मी जखमी सैनिकांना तिथून काढलं. यातील नऊ सैनिकांचा जागीच मृत्यू झाला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT