Miss Universe Sakal
ग्लोबल

Miss Universe मध्ये आता 'मिसेस'ही सहभागी होणार; ऐतिहासिक निर्णय

मातांनाही आता या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मिस युनिव्हर्स स्पर्धेनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत आता विवाहित महिला आणि मातांनाही सहभागी होता येणार आहेत. या स्पर्धेसाठीच्या निकषांमध्ये होणाऱ्या या बदलांचं सध्या कौतुक होत आहे. (Miss Universe beauty pageant new rules)

मिस युनिव्हर्स या जगातल्या सर्वोच्च स्पर्धांपैकी एक असलेल्या स्पर्धेचे निकष आता बदलण्यात आले आहेत. तुमचं लग्न झालंय की नाही, तुम्हाला मुलं आहेत की नाहीत, याचा आता या स्पर्धेशी काहीही संबंध नाही. २०२३ सालच्या स्पर्धेपासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला या अविवाहित असाव्यात, असाच निकष कायम लावला जात आला आहे. विशेषतः मातांना तर कायमच वगळण्यात आलं होतं. शिवाय मिस युनिव्हर्स झालेल्या महिलांना आपल्या कार्यकाळात गरोदरपणा टाळावा लागत होता. २०२० सालची मिस युनिव्हर्स ठरलेली मेक्सिकोची अँड्री मेझा हिने या नव्या नियमांचं कौतुक केलं आहे. सध्याचे नियम खूपच लिंगभेद करणारे आणि अतार्किक असल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCB Action: खोटी माहिती देणं पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला पडलं महाग; PCB ने ठोठावली दोन वर्षांची बंदी

Dr. Amol Kolhe : 'डॉ. काकोडकर समितीचे स्वागत पण झारीतील शुक्राचार्य कोण?'

Umrakhed News : कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने अल्पभूधारक शेतकर्‍याने संपविले जीवन

Rahul Gandhi Video: कारच्या 'फ्यूल टँक'ची कॅप उघडली अन् सरकारवर बरसले! राहुल गांधींचा E20 वर व्हिडीओ

अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रूममध्ये... बॉलिवूड हिरोच्या पत्नीने मागे लावली डिटेक्टिव्ह; झाले धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT