Pakistan esakal
ग्लोबल

पाकिस्तानात श्रीलंकन मॅनेजरला भरचौकात जाळलं; 100 जणांना अटक

सकाळ डिजिटल टीम

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानातून (Pakistan) धक्कादायक बातमी समोर आलीय.

सियालकोट : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानातून (Pakistan) धक्कादायक बातमी समोर आलीय. एका समूहानं पाकिस्तानी मजुरांनी श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून त्याला भरचौकात जिवंत जाळलंय. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये (Sialkot) हा धक्कादायक प्रकार काल दुपारी घडला. पाकिस्तानी क्रिकेट टीमचं साहित्य बनवणाऱ्या कारखान्यातील मजुरांनी हे अमानवीय कृत्य केलंय. याप्रकरणी 100 जणांना अटक केलीय.

जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या श्रीलंकन व्यक्तीचं प्रियांथा कुमारा (Priyantha Kumara) असं नाव असून प्रियांथा यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेलं धार्मिक पोस्टर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. त्यामुळं फॅक्टरीतील मजुरांसह भडकलेल्या जमावानं हे संतापजनक कृत्य केल्याचं समोर आलंय. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, श्रीलंकन ​​नागरिकाला मारलेल्यांची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांनी दहा टीम तयार केल्या आहेत.

पंजाब सरकारचे प्रवक्ते हसन खरवार यांनी पत्रकारांना सांगितलं की, मॉब लिंचिंग प्रकरणात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आलीय. समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून काहींची ओळख पटली असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनीही या कृत्याचा निषेध व्यक्त केलाय. त्यांनी म्हटलं की, हा देशासाठी लाजिरवाणा दिवस ​​आहे आणि यात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितलंय. दरम्यान, श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय, तर अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं स्वतंत्र तपासाचा आग्रह धरलाय. ही घटना वजिराबाद रोड परिसरात घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून पाकिस्तानविरोधात प्रचंड रोष पाहायला मिळतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT