Modi and Biden 
ग्लोबल

मोदी-बायडेन यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा

पीटीआय

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. कोरोनाविरोधातील लढाईत अधिक सहकार्याने लढण्यास कटिबद्ध असल्याचे दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितले. बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मोदी आणि त्यांच्यात थेट चर्चा झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. कोरोनाविरोधातील लढाई, जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणणे, दहशतवादाविरोधात एकत्र लढणे, हिंद-प्रशांत प्रदेशातील शांततेसाठी प्रयत्न करणे अशा मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी महत्त्वाकांक्षी अजेंडा तयार करण्याचे निश्‍चित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी हिंद-प्रशांत प्रदेशात संचार स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि प्रादेशिक एकात्मता टिकविण्यासाठी एकमेकांना अधिक सहकार्य करण्याचे मान्य केले. पर्यावरण बदलाच्या मुद्द्यावरही गंभीरपणे काम करण्याचा निश्‍चय दोन्ही देशांनी व्यक्त केला. म्यानमारमधील परिस्थितीवरही दोघांनी चर्चा केली. 

२० जानेवारील शपथ घेतल्यानंतर बायडेन यांनी नऊ देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. परंपरेप्रमाणे, अमेरिकेचे नवे अध्यक्ष सर्वप्रथम कॅनडा आणि मेक्सिको या शेजारील देशांच्या प्रमुखांशी चर्चा करतात. यानंतर बायडेन यांनी ‘नाटो’ करारातील देशांबरोबर संवाद साधला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: जय शाहांकडून Lionel Messi ला टीम इंडियाची जर्सी भेट, T20 World Cup साठीही आमंत्रण; फुटबॉलचा बादशाह दिल्लीत काय म्हणाला?

Pune Fraud : "तुला 'एमबीबीएस'ला ऍडमिशन घेऊन देतो"; असं बोलून केली सव्वा कोटींची फसवणूक; पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

वर्षाच्या शेवटी अमृता खानविलकरची चाहत्यांना खास भेट! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार

Pune News : नागरिक सुरक्षेसाठी मोठे पाऊल; सिंहगड रस्त्यावर 'नऱ्हे पोलिस स्टेशनचे' दिमाखात उद्घाटन!

Latest Marathi News Live Update : जायगावला साकारणार जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन

SCROLL FOR NEXT