Russian President Vladimir Putin shares what he discussed privately with Indian Prime Minister Narendra Modi during their car ride.

 

esakal

ग्लोबल

Modi Putin talks: गुपित उलगडले! मोदींसोबत गाडीत नेमकी काय चर्चा झाली?, खुद्द पुतिन यांनीच सांगितलं, म्हणाले...

Vladimir Putin reveals secret discussion with PM Modi during car ride: दोन्ही नेत्यांनी कारमध्ये सुमारे ५० मिनिटे चर्चा केली. मात्र, चर्चा नेमकी कशावर झाली होती हे आतापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

Mayur Ratnaparkhe

Putin Reveals Details of Private Talks with PM Modi : चीनमध्ये झालेल्या SCO शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील उत्तम केमिस्ट्री सर्वांनाच दिसून आली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन एकाच कारमध्ये दिसले, ज्याची जगभरात चर्चा होत होती.

दोन्ही नेत्यांनी कारमध्ये सुमारे ५० मिनिटे चर्चा केली, परंतु चर्चा नेमकी कशावर होती हे स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे यावरून विविध अंदाज वर्तवले जात होते. अखेर आता खुद्द रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीच स्वतः पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे उघड केलय. 

रशियन वृत्तसंस्था टासच्या वृत्तानुसार, व्लादिमीर पुतिन यांनी चीनमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, "हे काही गुपित नाही, मी त्यांना (मोदींना) अलास्कामध्ये आम्ही काय चर्चा केली ते सांगितले." पुतिन यांनी ऑगस्टमध्ये युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. पुतिन यांनी याच भेटीच्या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की दोन्ही नेत्यांनी कारमध्ये सुमारे एक तास खासगीत चर्चा केली. जेव्हा एखादी महत्त्वाची चर्चा सुरू असते, तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्यत्यय आणण्याचा वेळ नसतो. त्यांना तिथे सोयीचं वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी चर्चा सुरू ठेवली.

अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांनी फोनवरही चर्चा केली. यादरम्यान पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना अलास्कामध्ये झालेल्या बैठकीबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, 'माझ्या मित्राचे, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे फोन कॉलबद्दल आणि अलास्कामध्ये ट्रम्प यांच्यासोबतच्या त्यांच्या अलिकडच्या भेटीबद्दल माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT