Mohammad Hafeez Criticize Pakistan Government Over No Petrol No Cash In ATM in Lahore  ESAKAL
ग्लोबल

लाहोरमध्ये पेट्रोल नाही, ATM मध्ये कॅश नाही; माजी कर्णधाराचा घरचा आहेर

अनिरुद्ध संकपाळ

लाहोर : पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आपल्या टीकात्मक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने अनेकवेळा पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे. मात्र आज त्याने राजकीय निर्णयांमुळे पाकिस्तानमधील सामन्य जनता कशी होरपळून निघत आहे याचा पाढा वाचत पाकिस्तान सरकारवर (Pakistan Government) टीका केली.

मोहम्मद हाफिजने ट्विट केले की, 'लाहोरमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही? एटीएम मशिनमध्ये कॅश नाही? राजकीय निर्णयांसाठी सामन्य जनता होरपळून निघत आहे.' या कॅप्शनचे ट्विट त्याने माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) आणि सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांना टॅग केले आहे. शाहबाज शरिफ (Shehbaz Sharif) यांनी एप्रिल महिन्यात पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली आहे. त्यांनी इमरान खान यांच्या सरकारने विश्वास मत गमावल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा केला होता.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिजने तीनही क्रिकेट प्रकारात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. तो पाकिस्तानने 2017 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेल्या संघात देखील त्याचा समावेश होता. हाफिजने 12 हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. याचबरोबर 250 विकेट्स देखील घेतल्या आहे. तसेच तो पाकिस्तानचा काही काळ कर्णधार देखील होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT