viral सकाळ
ग्लोबल

एकाच वेळी दोन बॉयफ्रेंडपासून राहिली प्रेग्नन्ट? जन्मली जुळी मुले

एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिलाय पण आश्चर्याची बाब म्हणजे या जुळ्या मुलांचा DNA सारखा नाही.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकरणे उघडकीस येतात. जन्माला येणाऱ्या बाळांचे अनेक आगळे वेगळे प्रकरण समोर येतात पण सध्या सोशल मीडियावर एक प्रकरण बरंच गाजतयं. एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिलाय पण आश्चर्याची बाब म्हणजे या जुळ्या मुलांचा DNA सारखा नाही. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय.

सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलचं व्हायरल होतंय. या जुळ्या मुलांचा DNA यामुळे सारखा नाही कारण महिलेने एकाचवेळी दोन पुरुषांसोबत संबंध ठेवले होते आणि त्यामुळे ती एकाच वेळी दोघांपासून प्रेग्नट राहली. (Mom gives birth to twins but they have different bio dads)

जुळ्या मुलांना जन्म देणारी महिला ही एकाच वेळी दोन पुरुषांपासून प्रेग्नट होती त्यामुळे तीला जन्माला येणाऱ्या दोन जुळ्या मुलांचा DNA वेगवेगळा आहे. जगाच्या पाठीवर हे एक दुर्मिळ प्रकरण म्हणावं. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ब्राझीलच्या गोइंयास येथे ही महिला राहते. या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर मुलांची डीएनए टेस्ट करुन पाहिली. मात्र DNA रिपोर्ट बघून तिला धक्का बसला. जन्म दिलेल्या जुळ्या बाळांचा डीएनए सारखा नसल्याने कुणालाही धक्का बसणार.

या महिलेचे डॉक्टर तुलीओ जॉर्ज फ्रँको म्हणाले की जगात अशा दुर्मिळ घटना घडतात. लाखांमधून असे एखादे प्रकरण उघडकीस येतात. ते पुढे म्हणाले की जगात आतापर्यंत अशा जवळपास 20 घटना घडलेल्या आहेत ज्याला वैज्ञानिक भाषेत heteroparental superfecundation असेही म्हणतात.

हे सर्व प्रकरण उघडकीस आल्यानंतर या महिलेने आपण एकाच वेळी दोन पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. त्या दोघांपासून ही दोन मुले झाल्याचे तीला कळले. महिलेला विश्वास बसेना पण नंतर तीने हे सत्य स्वीकारलं.

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT