viral video 
ग्लोबल

Video: राक्षसी कृत्य कॅमेऱ्यात कैद! तो पाठीमागून आला, गळ्यात बेल्ट घालून तिला फरफटत नेलं अन्...

अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीमधून अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर (Viral Video) आला आहे

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीमधून अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर (Viral Video) आला आहे. एका ४५ वर्षीय महिलेवर एका अज्ञाताने बलात्कार केला आहे. न्यूयॉर्क सिटीच्या रस्त्यावरील मागच्या आठवड्यातील ही घटना आहे. सदर घटनेचे व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो अंगावर काटा आणणारा आहे. (Man Chokes Woman With Belt )

आरोपीने बेल्टच्या सहायाने महिलेचा गळा आवळला आणि तिला फरफटत नेले. त्यानंतर त्याने महिलेला दोन कारच्यामध्ये नेऊन अत्याचार केले आहेत. सकाळी तीनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५३ स्ट्रीटवर थर्ड अॅव्हेन्यू येथे ही घटना घडली. न्यूयॉर्क पोस्टने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.

एक महिला फूटपाथवरुन चालत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी तिच्या मागून चेहऱ्यावर मास्क लावलेला एक व्यक्ती येतो. त्याच्या हातात बेल्ट होता. त्याने ती बेल्ट महिलेच्या गळ्याभोवती आवळली अन् महिलेला फरफटत नेले. त्यावेळी महिला बेशुद्ध होते. बाजूला असलेल्या दोन कारच्यामध्ये महिलेला आरोपी घेऊन जातो आणि तिथेच तो तिच्यावर बलात्कार करतो. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा प्रकार धक्कादायक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा अद्याप शोध सुरु आहेत. आरोपी कोण आहे हे समजू शकलेलं नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत. आरोपी अद्याप सापडला नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT