muslim 
ग्लोबल

जपानमध्ये धर्मांतराची लाट? 10 वर्षांत मुस्लीम लोकसंख्येचा आकडा झाला दुप्पट!

सकाळन्यूजनेटवर्क

टोकीयो- जपान सध्या दुहेरी संकटाशी झुंजत आहे. एकीकडे जपानची लोकसंख्या घटत आहे आणि दुसरीकडे जन्मदरही कमी होत आहे. तसेच जपानमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा धर्मांतराचा विषयही चिंतेचा आहे. धर्मांतराची समस्या केवळ भारतात नाही, तर जपानही या समस्येशी झगडत आहे. जपानची लोकसंख्या जवळजवळ 13 कोटी आहे. गेल्या एक दशकात म्हणजे 10 वर्षांमध्ये मुस्लीमांची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. वेबसाईट economist.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 2010 मध्ये देशात मुस्लिमांची संख्या 1 लाख 10 हजार होती, 2020 मध्ये ती 2 लाख 30 हजार झाली आहे.

जपानमध्ये मुस्लीम समजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे सरकार आणि प्रशासन हैराण आहे. जपानच्या एकूण मुस्लीम लोकसंख्येचा विचार करता, यातील 50 हजार लोक जपानी आहेत, ज्यांनी धर्मांतर केलं आहे. ही अकडेवारी जपानच्या वसेडा यूनिवर्सिटीचे प्रोफेसर तनाडा हिरोफुमी यांनी जारी केली आहे. 

जपानसाठी धोका

जपानची घटती लोकसंख्या आणि जन्मदर कमी होत असल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपान विदेशी वर्कर्सवर फोकस करत आहे. जपानचे मुळ निवासी या बदलामुळे चिंतीत आहेत.

जपानमधील मुस्लीमांची संख्या वाढल्याने त्यांच्यासाठी सुविधाही वाढवण्यात आल्या आहेत. आता मुस्लीम लोकसंख्या अन्य वस्तूंची मागणी करु लागले आहेत. सरकारी डाटानुसार, जपानमध्ये मशिदींची संख्या 110 पेक्षा अधिक झाली आहे. एकीकडे मुस्लींमांची संख्या वाढत आहे, पण मुस्लीमांना काही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. कब्रिस्तानसाठी जागा शोधणे मुस्लीमांसाठी आवाहन बनले आहे. जपानमध्ये मृतदेहाला जाळण्याची पंरपरा आहे. आधी कब्रिस्तान होते, पण आता मुस्लीमांची संख्या वाढल्याने जागेसाठी अडचणी येत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Crime: बडतर्फ PSI निघाला SBI दरोड्याचा मास्टरमाइंड, कारागृहातच टोळी तयार करून आखला कट; जामिनावर सुटताच दरोडा

IND vs NZ 5th T20I: भारत-न्यूझीलंड पाचवा सामना किती वाजता सुरू होणार? फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या डिटेल्स

Iran US Tensions : इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या ७ अटी, पुन्हा हल्ला केला तर शांत बसणार नाही; ट्रम्प काय निर्णय घेणार? जगाचे लागले लक्ष

Water Cut: पाणीटंचाईतून दिलासा! १० टक्के कपात रद्द, पण दिवाळीनंतर घेणार 'हा' मोठा निर्णय

Solapur Farmer News: मोहोळमध्ये ५८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; पोखरापूरमधील घटनेने परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT