nato esakal
ग्लोबल

युद्ध निश्चित? अमेरिकेचे 8500 सैनिक 'हाय अलर्ट' वर

सकाळ डिजिटल टीम

नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ने जाहीर केले की, ते पूर्व युरोपच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैनात करत आहेत. यासोबतच ते रशियाच्या (russia) सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करत आहे. रशियाने आतापर्यंत किमान एक लाख सैनिक युक्रेनच्या (ukrain) सीमेवर पाठवल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. रशियन सैन्य देखील येथे युद्धाभ्यासात गुंतल्याचे समजते.

रशियाचा मोठा धोका लक्षात घेऊन नाटोची स्थापना

NATO ही युरोप आणि उत्तर अमेरिकेतील 30 देशांची संघटना आहे. यामध्ये फ्रान्स, बेल्जियम, लक्झेंबर्ग, यूके, नेदरलँड, कॅनडा, डेन्मार्क, आइसलँड, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, जर्मनी, यूएसए आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. रशियाचा मोठा धोका लक्षात घेऊन नाटोची स्थापना झाली. या करारानुसार, युतीच्या कोणत्याही देशावर हल्ला हा संपूर्ण नाटोवरील हल्ला मानला जाईल आणि ही संघटना शत्रूंवर कारवाई करण्यास स्वतंत्र असेल.

नाटो करारांतर्गत स्पेन बल्गेरियाला लढाऊ विमानेही पाठवत आहे

नाटोने आपल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की, ते बाल्टिक समुद्राच्या प्रदेशात आपल्या संरक्षणासाठी पूर्ण तयारी करत आहेत. यासाठी सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. मदतीसाठी, F-16 लढाऊ विमाने डेन्मार्कमधून बाल्टिक देश (रशियाच्या सीमेला लागून असलेला देश) लिथुआनियाला पाठवण्यात आली आहेत. याशिवाय नाटो करारांतर्गत स्पेन बल्गेरियाला लढाऊ विमानेही पाठवत आहे. फ्रान्सने बल्गेरियात आपले सैन्य पाठवण्याचे आधीच सांगितले आहे.

8,500 यूएस सैनिक 'हाय अलर्ट' वर

रशियाशी सामना करण्यासाठी अमेरिकाही तयार आहे दरम्यान, अमेरिकेतील काही अधिकार्‍यांनी दावा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन देखील पूर्व युरोप आणि बाल्टिक देशांमध्ये आपले सैन्य पाठवण्याच्या तयारीत आहेत. पेंटागॉनने म्हटले आहे की "युक्रेनियन सीमेवर चालू असलेल्या रशियन आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पूर्व युरोपमध्ये संभाव्य तैनातीसाठी 8,500 यूएस सैनिकांना 'हाय अलर्ट' वर ठेवले आहे."

बिडेन प्रशासनाचा रशियाशी थेट मुकाबला करण्याचा निर्णय

बिडेन यांनी अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि युद्धनौका रशियाला लागून असलेल्या बाल्टिक समुद्रात सैन्यासह उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. बिडेन प्रशासनाने रशियाशी थेट मुकाबला करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे, तर काही दिवसांपूर्वीपर्यंत अमेरिका युक्रेनवर हल्ला करण्याची चूक करू नये, असे चर्चेतून रशियाला सातत्याने आवाहन करत होती.

युक्रेनवर अमेरिका-युरोपच्या हल्ल्याची भीती रशिया लवकरच युक्रेनवर हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. अध्यक्ष जो बिडेन यांनी भूतकाळात म्हटले होते की त्यांना वाटते की त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनमध्ये हस्तक्षेप करतील, परंतु त्यांनी युद्ध टाळले पाहिजे. रशिया लवकरच युक्रेनवर हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शहापूरमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना

Pimpri Chinchwad: सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठेलाही साज; वैविध्यपूर्ण वस्तू दाखल, दिवाळीनिमित्त घराला उत्सवाचा ‘लुक’

Narak Chaturdashi Real Story: श्रीकृष्णाने नाही तर, पत्नीने केलेला नरकासुराचा वध? जाणून घ्या नरकचतुर्दशी साजरी करण्याचे खरे कारण

CM Devendra Fadnavis: एका SMS वर दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्रे हलली अन् शेतमजूर दांपत्याला घडविले मुलाचे अंत्यदर्शन

Thane News: हृदयद्रावक! कबुतराला वाचवताना अग्निशमन जवानाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT