Nira Chhantyal Sakal
ग्लोबल

Nepal Plane Crash : संक्रांतीच्या शुभेच्छा ठरल्या अखेरच्या; लोककलावंताची पोस्ट व्हायरल

या भीषण अपघातात पाच भारतीयांचाही मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nepal Plane Crash : नेपाळच्या पोखरामध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताता आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Nepal Folk Singer Nira Chhantyal Last Post Before Accident)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

तर, चार जणांचा अद्याप शोध घेतला जात आहे. या भीषण अपघातात पाच भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तसेच नेपाळची प्रसिद्ध लोककलावंत नीरा चंत्याल यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

नीरा यांची बहीण हीरा चंत्याल शेरचन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अपघातापूर्वी नीरा चंत्याल यांची शेवटची फेसबुक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चंत्याल या चंत्याल यूथ एसोसिएशनतर्फे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, त्याआधी घडलेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, चंत्याल यांच्या चाहत्यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

शेवटच्या पोस्टमध्ये काय?

चंत्याल यांनी फेसबुकवरील शेवटची पोस्ट अपघातापूर्वी एक दिवस आधी फेसबुकवर पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

तसेच रविवारी आपण पोखरामध्ये उपस्थित राहणार असल्याचे नमुद केले होते. मात्र, आयुष्यातील ही फेसबुक पोस्ट अखेरची पोस्ट ठरेल हे कुणालाच माहिती नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

Kelva Beach: वीकेंडला निसर्गाचा आनंद घ्यायचा? मग डहाणू ट्रेनने निघा आणि थेट ‘केळवा बीच’वर पोहोचा

Maharashtra Politics:'सुशीलकुमार शिंदेंच्या गुगलींवर शरद पवारांचा गुड लेफ्ट'; बॅटिंग टाळली, जुन्या आठवणींना उजाळा..

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

SCROLL FOR NEXT