Nepal President Ramchandra Paudel announces resignation amid deepening political crisis.

 

esakal

ग्लोबल

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Political Crisis : नेपाळमधील परिस्थिती प्रचंड चिघळलेली आहे; पंतप्रधान ओली देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.

Mayur Ratnaparkhe

Nepal President Ramchandra Paudel resignation : नेपाळमध्ये सध्या अराजकतेचे वातावरण परले आहे. सोशल मीडियावरील बंदविरोधात तेथील तरूणाईने सुरू केलेलं आंदोलन प्रचंड हिंसक बनले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली असून, नेपाळची संसदही पेटवली गेली आहे.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील बंदी हटवणार नसल्याची ठाम भूमिका घेणारे,  पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनीही राजीनामा दिलेला असताना, आता यापाठोपाठ राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला आहे. तर या दोघांच्याआधी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला होता.

प्राप्त माहितीनुसार या हिंसक आंदोलनाने आतापर्यंत २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे. तर २०० पेक्षा अधिकजण जखमी झालेले आहेत. आंदोलकांकडून रस्त्यावर जाळपोळ, तोडफोड केली जात आहे. नेपाळच्या माजी पंतप्रधानांना, अर्थमंत्र्यांना प्रचंड मारहाण झाली आहे. या आंदोलनाचे पडसाद सीमीवरही दिसत आहेत.

भारत सरकारने नेपाळमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलली असून, एक हेल्पाईन नंबरही जारी केला आहे. शिवाय, भारतीय पर्यटकांना नेपाळ सीमेवरच रोखलं गेलं आहे. नेपाळमधील मालवाहतूकही ठप्प झालेली आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान, मोठ मॉल पेटवले आहेत. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाकडून बळाचा वापर सुरू आहे.

देशातील तरुणांचा वाढता रोष बघता नेपाळच्या सैन्याने पंतप्रधान ओली यांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान ओलींनी कोणत्याही क्षणी देश सोडण्याची शक्यता आहे. त्यांनी सेना प्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT