china university esakal
ग्लोबल

CHINA | विद्यापीठ कॅम्पस लॉक; 1500 विद्यार्थी हॉटेलमध्ये स्थलांतरित

चीनमध्ये अचानक 1500 विद्यार्थ्यांचे हॉटेलमध्ये स्थलांतरण

सकाळ डिजिटल टीम

चीन : डेलियनमधल्या झुआन्घे विद्यापीठात (Zhuanghe University) परिसरात एकाएक लावलेला लॉकडाऊन...आणि जवळपास १५०० विद्यार्थ्यांचे एकाएकी हॉटेलमध्ये करण्यात आलेले स्थलांतरण..या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे चीनमधील लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला आहे

एकाएक शेकडो विद्यार्थी स्थलांतरित

चीनच्या डेलियन (Dalian) शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. डेलियनमधल्या झुआन्घे विद्यापीठात (Zhuanghe University) अनेक कोविडचे रूग्ण सापडल्यानंतर, चीन सरकारने एकाएक शेकडो विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले. विद्यापीठातील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहांमध्ये आणि हॉटेलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्याचे आदेश रविवारी दिले गेले. क्वारंटाईन मध्ये रहाणे, अनिवार्य कोविड चाचणी आणि प्रवास निर्बंध हा चीनी लोकांसाठी दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. चीन देशाचा लसीकरण दर जगात सर्वात जास्त आहे आणि हिवाळ्यात बूस्टर डोसही दिला जाणार आहे. तरीही अशी परिस्थिती आहे. कोविडचा मागच्या महीन्यापासून अनेक शहरांमध्ये उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले गेले आहे.

बुधवारपासून, राजधानी बीजिंगमध्ये, देशाच्या इतर भागातून विमान, ट्रेन किंवा कारने येणार्‍या सर्व लोकांना मागील 48 तासांत घेतलेल्या कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण 98,315 रुग्णांची आणि 4,636 मृत्यू नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईनं मोडला 11 वर्षांचा रेकॉर्ड! तापमान थेट ३८.२ अंश पार; पुढील ६ तास उष्णतेच्या लाटेचा इशारा

सेरेब्रल पाल्सीमुळे हालचालींवर कसा होतो परिणाम? Breaking Bad फेम RJ Mitte यांच्या आजाराविषयी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Anvay Dravid: 7 Fours, 5 Sixes... द्रविडच्या लेकाची आर्यवीर सेगवागच्या संघाविरुद्ध फटकेबाजी; नितीश अन् ध्रुवचीही शतकं

Success Story: आई गाईचा गोठा सांभाळते, वडील शेती करतात; लेकीने जिद्दीच्या जोरावर गाठली पोलीस वर्दी, अनुजा पवारचा प्रेरणादायी प्रवास

Farmer Success: डाळिंबाच्या बागेत टरबुजाचे आंतरपीक; १० एकरांत २२५ टन उत्पादनाचा प्रयोग

SCROLL FOR NEXT