nigerian boy barefoot best ballet performance video viral
nigerian boy barefoot best ballet performance video viral 
ग्लोबल

बॅले डान्सचा व्हिडिओ पाहून मिळाली कौतुकाची थाप अन्...

वृत्तसंस्था

अबूजा (नायजेरिया): एका 11 वर्षाच्या नायजेरियन मुलाने पावसात बॅले डान्स केला असून, संबधित व्हिडिओ व्हायल झाला. नेटिझन्सनी कौतुकाची थाप दिलीच पण डान्स पाहिल्यानंतर न्यूयॉर्क डान्स स्कूलने त्याला शिष्यवृत्ती दिली.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण एका रात्रीत चर्चेत येतात. सध्या नायजेरियन मुलगा चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा 11 वर्षांचा असून, त्याचे नाव अँथनी मेमसोमा मैडू आहे. घराच्या बाहेरील पटांगणामध्ये तो बॅले डान्स करत आहे. यावेळी पाऊस पडत आहे आणि बॅले डान्ससाठी लागणारा पोषाख, शूज काहीच नसतानाही तो भरपावसात अनवाणी पायांनी बॅले डान्स करत आहे. शिवाय, कोणतेही संगीत नाही. त्याच्या हाता-पायाच्या हालचाली अक्षरश: थक्क करणाऱ्या आहेत.

मुलाच्या बॅले डान्सचा व्हिडिओ लीप ऍकॅडमीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी त्याला डोक्यावर घेतले. सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर न्यूयॉर्क डान्स स्कूलने त्याला कौतुकाची थाप म्हणून शिष्यवृत्ती दिली आहे. एका व्हिडिओमुळे अँथनीचे आयुष्य बदलून गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT