North Korea eSakal
ग्लोबल

North Korea : अमेरिका-दक्षिण कोरिया जवळीक उत्तर कोरियाला सहन होईना; समुद्रात केली अण्वस्त्र चाचणी

US-North Korea : अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा संयुक्त लष्करी सराव नुकताच पार पडला.

Sudesh

अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये संयुक्त लष्करी सराव काही दिवसांपूर्वीच पार पडला. यामुळे उत्तर कोरियाचा तिळपापड होत आहे. त्यामुळेच उत्तर कोरियाने शनिवारी अचानक टॅक्टिकल न्यूक्लिअर अटॅकची चाचणी केली. यामध्ये दोन मोठ्या रेंजच्या क्रूज मिसाईल समुद्रात डागण्यात आल्या. याव्यतिरिक्त आणखी काही मिसाईल्स फायर केल्याचंही म्हटलं जात आहे.

कोरियन द्विपकल्पाच्या पश्चिमी दिशेला असलेल्या समुद्रात या मिसाईल डागण्यात आल्या. यामध्ये डमी अण्वस्त्र देखील लोड करण्यात आलं होतं. उत्तर कोरियाने यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक शस्त्रास्त्र चाचण्या पार पाडल्या आहेत.

किम जोंग यांचा दौरा

नॉर्थ कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी शस्त्रास्त्र आणि जहाज निर्मिती कारखान्यांनाही भेट दिली. उत्तर कोरिया आपल्या नौदलाची ताकद वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी किम जोंग संपूर्ण पूर्व सीमेवर दौरा करत आहे.

अमेरिका-दक्षिण कोरिया सराव

दरम्यान, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा संयुक्त लष्करी सराव नुकताच पार पडला. याला उल्ची फ्रीडम शील्ड असं म्हटलं जातं. गुरुवारी हा सराव पूर्ण झाला. या सरावाच्या आडून दक्षिण कोरिया आणि अमेरिका उत्तर कोरियाशी युद्धाची पूर्वतयारी करत असल्याचा आरोप यापूर्वी किम जोंग यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT