kim jong un and trump 
ग्लोबल

तोंड बंद ठेवा; किम जोंग उन यांची ट्रम्पना धमकी

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया याच्यातील संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने उत्तर कोरियावर टीका केली होती. यावर उत्तर कोरियाने प्रत्युत्तर दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना देशातील राष्ट्रपतीपदाची निवडणूक कायदेशीररित्या पार पडावी असं वाटत असेल तर त्यांनी तोंड बंद ठेवावे, अशी धमकी उत्तर कोरिया कडून देण्यात आली आहे.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये सुरु असलेल्या वादापासून अमेरिकेने दूर रहावे. येत्या काळात अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहेत. ही निवडणूक कायदेशीर पद्धतीने सुरळीत पार पाडावी असं वाटत असेल तर ट्रम्प यांनी तोंड बंद ठेवावे. दूसऱ्यांच्या अतंर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करु नये, असा इशारा उत्तर कोरियाने दिला होता. 

उत्तर कोरियाचे हुकमशहा किंम जोंग उन हे दक्षिण कोरियावर संतापले आहेत. त्यांनी शेजारी राष्ट्राशी सर्व प्रकारचे लष्करी आणि राजनैतिक संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरिया या देशावर टीका केली होती. परिणामी उत्तर कोरियाने पलटवार केला आहे.

दरम्यान, सीमेपार पत्रकं फेकणे, हवेत फुगे सोडणे अशाप्रकारच्या घटना कोरियाई देशांच्या सीमेवर घडत आहेत. पत्रकांमध्ये आणि फुग्यांमध्ये किम जोंग उन यांच्या विरोधात अश्लिल भाषा आणि उत्तर कोरियातील सरकारविरोधी लिहिलं जातं आहे. उत्तर कोरियाने अनेक वेळा याविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, दक्षिण कोरियाकडून याची दखल घेतली जात नाही असं सांगत उत्तर कोरियाने संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर कोरिया सर्वात आधी कोरियाई देशांमध्ये असलेल्या संपर्क लाईनला तोडणार आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संपर्क पूर्णपणे तुटणार आहे. तसेच राष्ट्रपतींसाठी तयार करण्यात आलेली हॉट लाईन देखील तोडली जाणार आहे. दक्षिण कोरियाच्या विश्वासघातकी वागणुकीवर आम्ही नाराज असल्याचं उत्तर कोरियाने म्हटलं आहे. तसेच दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य करुन किम जोंग उन यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली आहे, असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT