Vaccination Sakal
ग्लोबल

कोरोनावरील लस घ्या अन् कोट्यधीश व्हा!

कार्तिक पुजारी

लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ओहिओ राज्याने एक भन्नाट ऑफर आणली आहे

वॉशिंग्टन- जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारी थैमान घालत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना स्थिती गंभीर आहेत, तर अनेक देशांनी विविध मार्गांनी संसर्गावर नियंत्रणाचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीच्या काळात लस उपलब्ध नसल्याने अनेक देशांना कठोर लॉकडाऊनचा अवलंब करावा लागला. पण, आता कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. अनेक कंपन्यांच्या लशी बाजारात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात लसीकरणही सुरु करण्यात आलं आहे. असे असताना काही ठिकाणी लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ओहिओ राज्याने एक भन्नाट ऑफर आणली आहे. यामुळे लसीकरणचा वेग वाढल्याचं दिसून आलंय. (Ohio get COVID vaccine be millionaire Vax a Million lottery campaign)

ओहिओ राज्याने लशीचा किमान एक डोस घेणाऱ्यांसाठी लॉटरी आणली आहे. लशीचा डोस घेणाऱ्याला लॉटरी लागली तर तो 1 मिलियन डॉलर (7 कोटींपेक्षा अधिक) जिंकू शकतो. विशेष म्हणजे दर एक आठवड्याला ही लॉटरी कोणाला लागली ते घोषित केले जाणार आहे. पाच आठवड्यांसाठी हे लॉटरी कॅम्पेन सुरु असेल. यासाठी प्रशासनाने कोविड-19 रिलिफ फंडमधून 5 मिलियन डॉलरला मंजुरी दिली आहे. विशेष करुन किशोरवयीन मुलांना लस घेण्यासाठी प्रोत्याहित करण्यासाठी हे कॅम्पेन आणण्यात आलं आहे.

अमेरिकेमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून मोठ्या लोकसंख्येला लस देण्यात आली आहे. असे असले तरी अजून 40 टक्के तरुणांनी लस घेतलेली नाही. अशा लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने विविध मार्गाने प्रयत्न चालवले आहेत. ओहिओ सरकारने पहिल्या विजेत्याचीही घोषणा केली आहे. Abbigail Bugenske याला एक मिलियन अमेरिकी डॉलरची लॉटरी लागली आहे. टेलिव्हिजनवरुन याची घोषणा करण्यात आली होती. उत्तेजनार्थ बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवर्ती दिली जात आहे.

ओहिओ सरकारने सुरु केलेल्या “Vax-a-Million” योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास 30 लाख लोकांनी या लॉटरीसाठी नाव नोंदवलं आहे. शिवाय लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक लोक लस घेण्यासाठी पुढाकार घेत आहे. सरकारने जारी केलेल्या या लॉटरी पद्धतीची जगभरात चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT