युक्रेन Emilio Morenatti
ग्लोबल

युक्रेनमधून एक लाख नागरिकांचे पलायन

पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, रूमानियाच्या सरकारकडून निवाऱ्याची सोय

सकाळ वृत्तसेवा

प्रेझमिसल : युक्रेनची राजधानी किव्ह व अन्य शहरांमध्ये रशियाने हवाई हल्ले सुरू केल्याने तेथील हजारो नागरिक सुरक्षित निवाऱ्यासाठी युक्रेनच्या पश्‍चिमेकडील देशांमध्ये पलायन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसंबंधीच्या संघटनेने आज दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमधून एक लाख २० हजार नागरिकांनी शेजारील देशातून पलायन केले. परिस्थिती आणखी बिघडली तर ४० लाख नागरिक पलायन करतील, अशी शक्यताही वर्तविली आहे.

अमेरिकेच्या मॅक्सर टेक्नॉलॉजिस या कंपनीने काल काढलेल्या उपग्रहीय छायाचित्रांत रुमानिया- युक्रेनच्या सीमेजवळ मोटारी व ट्रकच्या सीमेजवळ कित्येक किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी सैन्य भरतीसाठी वयाची अट शिथिल केल्यानंतर युक्रेनमधून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. मात्र १६ ते ६० वर्षेवयोगटातील पुरुषांना प्रवासावर बंदी घातल्याने शेजारील देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्यांमध्ये महिला व मुलांची संख्या जास्त आहे. सीमेवर पोचण्‍यासाठी युक्रेनी नागरिकांची रेल्वे स्थानकावर झुंबड उडाली असून रेल्वेला लटकून नागरिक प्रवास करीत आहे, असे सांगताना किव्हमधील दारिया नावाच्या महिलेला अश्रू अनावर झाले होते. विल्मा शुगर (वय ६०) या महिलेनेही उझ्झोरोडमधील घर सोडून हंगेरीत पलायन केले. पण तिच्या ४७ वर्षांच्या मुलाला हृदयाचा झटका आल्याने त्याला मध्यातच थांबावे लागले. मुलाशी फोनवरून संपर्कात असल्याचे तिने सांगितले. रेल्वे स्थानकात पुरुषांना प्रवेश दिला जात नसल्याचे इर्झसेबेट कोव्हास्क (वय ५०) हिने सांगितले. ती म्हणाला, ‘‘महिलांना रेल्वेत चढू दिले, पण पुरूषांना अडविण्यात आले. युक्रेनी अधिकारी अतिशय चांगली वागणूक देत आहे. पुरूषांनी देशाच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन अधिकारी करीत आहेत.’’

आतापर्यंत एक लाख १६ हजार युक्रेनी नागरिकांनी देश सोडला आहे. प्रत्येत मिनिटात ही संख्या सतत वाढत आहे.

शाबिया मिंटो, प्रवक्त्या, ‘यूएन’च्या निर्वासितांसंबंधीचे उच्चायुक्तालय

सध्याच्या युद्ध स्थितीमुळे युक्रेनमधून पलायन करणाऱ्या सर्व नागरिकांना युरोपियन संघ सामावून घेईल. आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी आणू.

- ॲनालिना बेअरबॉक,परराष्ट्र मंत्री, जर्मनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

SCROLL FOR NEXT