ग्लोबल

Indian Air Strike: दिल्लीत पाकिस्तानचा झेंडा फडकणार; शरीफ बरळले

वृत्तसंस्था

लखनौ- भारतीय हवाईदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनी तर दिल्लीमध्ये लवकरच पाकिस्तानचा झेंडा फडकेल, असे म्हटले आहे. 

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंगळवारी पहाटे बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा तळ नष्ट करण्यात आला आहे.

शाहबाज शरीफने पाकिस्तानी वृत्त वाहिनीशी बोलताना पाकिस्तानी झेंडा आता दिल्लीत फडकेल, असे म्हटले. याचदरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताने हवाई सीमेचे उल्लंघन केले असून इस्लामाबादला उत्तर देण्याचा अधिकार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले. 

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते. आज भारतीय हवाईदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. त्यामध्ये जवळजवळ 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT