pakistan sakal
ग्लोबल

चहा कमी प्या,अर्थव्यवस्था वाचवा; पाकिस्तानचं नागरिकांना आवाहन

एका पाकिस्तानी मंत्र्याने देशाची अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी चहाचे सेवन कमी करण्याचे नागरीकांना आवाहन केले.

सकाळ डिजिटल टीम

सध्या पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करतोय पाकिस्तानची अर्थव्यवस्था डगमगली असून सरकार ती रुळावर आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताहेत. मंगळवारी एका मंत्र्याने देशाची अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी चहाचे सेवन कमी करण्याचे पाकिस्तानी नागरीकांना आवाहन केले. यातून पाकिस्तान सरकारची हतबलता आणि चिडचिड पुन्हा एकदा समोर आली.

सध्या या मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी पाकिस्तानला ट्रोल करत आहे.

एका पत्रकार परिषदेत मंत्री अहसान इक्बाल यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी नागरिकांना एक कप चहा कमी करण्याचे आवाहन केले.सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

पाकिस्तान मोठ्या संकटाचा सामना करत आहे. दहशतवाद, मध्यंतरी दीर्घकाळ चालणारे राजकीय संकट होते तर आता हे आर्थिक संकट आहे.या संकटात त्यांचा जवळचा मित्र चीन देखील मदत करण्यात अयशस्वी ठरलाय.

सध्या देश गंभीर आर्थिक मंदीच्या दिशेने असताना पाकिस्तान समोर कर्जफेड करण्याच्या अनेक समस्या आहेत. यात या पाकिस्तानी मंत्र्याने चहा पिण्यावर मर्यादा घालण्यासाठी केलेल्या विधानाचे व्हिडिओ फुटेज काही वेळातच व्हायरल झाले यावर आता नेटिझन्स सोशल मीडियावर पाकिस्तानच्या सत्ताधारकांची थट्टा उडवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT