Pakistan esakal
ग्लोबल

पाकिस्तानात चोरीप्रकरणी 4 जणींना केलं रस्त्यावर विवस्त्र

सकाळ डिजिटल टीम

'त्यांनी आम्हाला ओढून नेऊन रस्त्यावर विवस्त्र केलं आणि मारहाण केली.'

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतात एका दुकानातून चोरीचा आरोप करत पुरुषांच्या एका गटानं एका किशोरवयीन मुलीसह चार महिलांना विवस्त्र केलं आणि त्यांना रस्त्यावर ओढत नेलं. लाहोरपासून 180 किमी अंतरावर असलेल्या फैसलाबादमध्ये (Faisalabad) सोमवारी ही घटना घडलीय. सोशल मीडियातून समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एका किशोरवयीन मुलीसह चार महिला आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्यांचं शरीर झाकण्यासाठी विनंती करताना दिसताहेत, परंतु त्यांना लाठ्यांनं मारहाण करण्यात आली.

व्हायरल व्हिडिओत या स्त्रिया रडताना दिसत असून लोकांना आम्हाला सोडून द्या, अशी विनंती करताना दिसताहेत; पण कोणीही त्यांच्या मदतीला धावून आलं नाही. तासभर रस्त्यावर त्या नग्नावस्थेत होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंजाब पोलिसांनी कारवाई केलीय. पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्यानं मंगळवारी एका ट्विटमध्ये सांगितलं, की आम्ही या दुर्दैवी घटनेसंदर्भात पाच जणांना अटक केलीय. कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार पाच संशयित आणि इतर अनेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी पीडितांनी सांगितलं, की त्या फैसलाबाद येथील बावा चक मार्केटमध्ये कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या.

तक्रारीत महिलांनी म्हटलं की, आम्हाला तहान लागली म्हणून आम्ही उस्मान इलेक्ट्रिक स्टोअरमध्ये जाऊन पाण्याची बाटली मागितली. मात्र, त्याचा मालक सद्दाम यानं आमच्यावर चोरीच्या उद्देशानं दुकानात प्रवेश केल्याचा आरोप केला. सद्दाम व इतरांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला ओढून नेऊन रस्त्यावर विवस्त्र केलं आणि मारहाण केली. कपडे उतरवल्यानंतर त्यांनी आमचा व्हिडिओही बनवला. मात्र, हा अत्याचार थांबवण्यासाठी जमावातील कोणीही गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT