Pakistan PM Shehbaz Sharif Esakal
ग्लोबल

Pakistan PM : मोदीवर प्रेम नाही तर नाईलाज...; शाहबाज शरीफ यांच्या शुभेच्छांच्या मेसेजवर पाकच्या संरक्षण मंत्र्याचं स्पष्टीकरण

Pakistan PM Shehbaz Sharif: सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. आता पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, ते मोदींवरील प्रेमाखातर अभिनंदन केले नव्हते, ते नाईलाजास्तव केले होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेतली आहेत. मोदींनी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या शपथविधीबद्दल जगभरातील देशांतून अभिनंदनाचे संदेश आले. त्यात भारताचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचेही नाव होते. शाहबाज यांनी एका छोट्या संदेशात पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि पीएम मोदींनी त्यांचे आभार मानले. आता याप्रकरणी पाकिस्तानकडून नवे वक्तव्य समोर आले आहे. पाकिस्तानी वाहिनी जिओ टीव्हीशी बोलताना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, शाहबाज यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणे हे प्रेमापोटी नव्हते, तर आमच्या पंतप्रधानांना नाईलाजास्तव असे करावे लागले.

पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केल्यानंतर पाकिस्तानकडून हे स्पष्टीकरण आले आहे. शेजारील देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, हे शहबाजचे पीएम मोदींवरील प्रेम नसून नाईलाजास्तव आहे. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण संबंधांचा दीर्घ इतिहास आहे.

मोदी मुस्लिमांचे मारेकरी : ख्वाजा

सोमवारी जिओ न्यूजच्या कॅपिटल टॉक कार्यक्रमात बोलताना आसिफ ख्वाजा म्हणाले, "भारतीय पंतप्रधान बनल्याबद्दल मोदींचे अभिनंदन करणे ही आमची राजनयिक नाईलाज आहे." मोदी हे भारतातील 'मुस्लिमांचे मारेकरी' आहेत हे पाकिस्तान कधीही विसरणार नाही, असे आसिफ म्हणाले.

शाहबाज आणि नवाज यांनी पंतप्रधान मोदींना पाठवला शुभेच्छा संदेश

आदल्या दिवशी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींचे शपथविधीबद्दल अभिनंदन केले होते. सोशल मिडीया X वर, पीएम शहबाज यांनी लिहिले होते, "भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन." शहबाजच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले होते, तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

याशिवाय माजी पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे अध्यक्ष नवाझ शरीफ यांनीही यावेळी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि म्हटले की, “तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मोदीजींचे हार्दिक अभिनंदन. . नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुमच्या पक्षाला मिळालेले यश तुमच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दर्शवते. आपण द्वेष बाजूला ठेवून दक्षिण आशियातील दोन अब्ज लोकांच्या नशिबी बदल घडवून आणण्यासाठी काम करूया.”

नवाझ यांना प्रत्युत्तर देताना पीएम मोदींनी ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते, "मी तुमच्या संदेशाचे (नवाझ शरीफ) कौतुक करतो. भारतातील लोक नेहमीच शांतता, सुरक्षा आणि प्रगतीशील विचारांसाठी उभे राहिले आहेत. आपल्या लोकांचे कल्याण आणि सुरक्षितता याला आमचे नेहमीच प्राधान्य असेल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर अपघात! धावत्या ट्रकला फॉर्च्युनर गाडीची धडक

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

SCROLL FOR NEXT