Pakistan-Iran 
ग्लोबल

Pakistan-Iran: इराणसोबतचे संबंध चिघळले! पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय; चीन करतोय मध्यस्थीचा प्रयत्न

Pakistan-Iran attack on the Balochistan: पाकिस्तानने बुधवारी इराणमधील आपल्या राजदूतांना परत बोलावलं आहे. इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मिसाईल हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- पाकिस्तानने बुधवारी इराणमधील आपल्या राजदूतांना परत बोलावलं आहे. इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मिसाईल हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. तसेच इराणचे पाकिस्तानमधील राजदूत, जे सध्या इराणमध्येच आहेत. त्यांना परत पाकिस्तानमध्ये न येण्यास सांगितलं आहे. (Pakistan recalled its ambassador to Iran after the attack on the Balochistan province)

मंगळवारी रात्री, तेहरानच्या राज्य मीडियाने माहिती दिली की, इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील दोन दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला आहे. पाकिस्तानने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू झालाय, तर तीन जण जखमी झाल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. हवाई हद्दीच्या नियमांचे इराणने उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केलाय. हा आमच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आहे. आम्ही हे कधीही सहन करणार नाही आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम पाकिस्तानने इराणला दिला आहे. दुसरीकडे, इराणने म्हटलंय की, बलुचिस्तानमधील दहशतवादी राहत असलेल्या दोन केंद्रावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे.

चीनचा मध्यस्थीचा प्रयत्न

चीनने इराण आणि पाकिस्तानला सबुरीचा सल्ला दिला आहे. चीन म्हणालंय की, पाकिस्तान आणि इराण दोन्ही इस्लामिक देश आहेत. तसेच ते एकमेकांचे शेजारी देखील आहेत. त्यामुळे त्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. पाकिस्तान आणि इराण दोघेही चीनचे सहकारी देश आहेत. दोन्ही देश शांघाई सहयोग संघटनेचे सदस्य आहेत.

दरम्यान, इराणने दोन दिवसांपूर्वी इराकवर मिसाईल हल्ला केला होता. यावेळी इराणने इस्राइलची गुप्तहेर संघटना मोसादचे कार्यालय आणि दहशतवादी तळावर हल्ला केल्याचा दावा केला होता. इराण शेजारी राष्ट्रांबाबत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे पूर्व आशियाबाबत चिंता वाढत असून अस्थिरतेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: मैथिली ठाकूर निवडणुकीच्या आखाड्यात; बिहारमध्ये भाजपचं 'सेलिब्रिटी पॉलिटिक्स'

Vadgaon Sheri News : लंडनच्या रोबोटची वडगाव शेरीत ‘कमाल’; तीनशे मीटर आत जाऊन शोधले बेकायदा नळजोड

Saraswati River India: भारतात सरस्वती नदी कोणत्या ठिकाणी दिसते? जाणून घ्या तिचा मार्ग आणि ठिकाणं

अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी.

Palghar News: मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध! जनसुनावणीत ८ हजारांहून अधिक विरोधी निवेदने

SCROLL FOR NEXT