Pakistan Prime Minister Imran Khan
Pakistan Prime Minister Imran Khan esakal
ग्लोबल

Pakistan|अफगाणिस्तानमुळे पाकिस्तान हैरान, संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागितली मदत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ज्या तालिबानला पाकिस्तानने पोसले, आता त्याच्यापासूनच धोका वाटत आहे. अफगाणिस्तानमधून होणाऱ्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान चिंतेत आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) सीमेवरुन दहशतवादी हल्ल्यांचे समर्थन करणाऱ्यांना जबाबदार धरण्याचा आग्रह धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले आहे. गेल्या तीन हल्ल्यांमध्ये पाकिस्तान लष्कराचे १७ सैनिक मारले गेले आहेत. यात एका लष्करी अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलशन्सने या हल्ल्यांनंतर म्हटले होते, की बलुचिस्तानमध्ये हल्ले करणारे अफगाणिस्तान (Afghanistan) आणि भारतातील आपल्या प्रमुखांशी बोलत होते. त्यांना आम्ही इंटरसेप्ट केले होते. पाकिस्तानचे प्रतिनिधी उमर सिद्दिकी यांना संयुक्त राष्ट्रसंघाला आग्रह केला की अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी केला जाऊ नये. (Pakistan Request UNSC To Help Stop Attacks From Afghanistan)

टीटीपीने पाकिस्तानात हल्ले वाढवले

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये नियंत्रण मिळविल्यानंतर पाकिस्तानमध्ये हल्ले सतत वाढत आहेत. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) काही महिन्यांमध्ये अनेक हल्ले केले आहेत. टीटीपीने काबूलमध्ये तालिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर तालिबानला शुभेच्छा दिल्या होत्या. या बरोबरच पाकिस्तानमध्ये एक इस्लामी कायदे आणि मुस्लिम स्टेट लागू करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवण्याची शपथ घेतली होती.

टीटीपी दहशतवादी संघटना अल कायदाच्या विचारांविषयी निष्ठा ठेवते. पाकिस्तानी लष्कर अनेक वर्षांपासून टीटीपीशी लढा देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT