Hafiz-Saeed 
ग्लोबल

26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद 'टेरर फायनान्सिंग'मध्ये ठरला दोषी!

वृत्तसंस्था

लाहोर (पाकिस्तान) : पाकिस्तानातील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) बुधवारी (ता.11) मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जम्मत-उद-दावाचा (ज.यु.डी.) प्रमुख हाफिज सईद सह इतर चार नेत्यांना दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविले आहे. 

यापूर्वी शनिवारी न्यायालयाते आरोपींपैकी एक आरोपी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 11 डिसेंबरपर्यंत तहकूब केली होती. आज (ता. 11) झालेल्या सुनावणीमध्ये सईदच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद सादर करत तो नोर्दोश असल्याचे सांगितले होते.

मात्र, यानंतर न्यायालयाने पंजाब दहशतवादविरोधी विभागाला साक्षीदारांना हजर न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश देत या खटल्याची कार्यवाही गुरूवारपर्यंत तहकूब केली आहे. 

सईदवर अल-अनफल ट्रस्ट, दावतुल इरशाद ट्रस्ट आणि मुआझ बिन जबल ट्रस्ट या ट्रस्टच्या नावाखाली लाहोर, गुजराणवाला आणि मुल्तानसह इतर शहरांमध्ये दहशतवादाकरता वित्तपुरवठा करण्यासाठी निधी उभारला गेल्याचा आरोप आहे.

पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) 17 जुलै रोजी सईद आणि त्याच्या 13 साथीदारांविरूद्ध पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये दहशतवादासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी 23 प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवले होते. यानंतर सीटीडीने हफीज सईदला पाकिस्तानचा दहशतवादविरोधी कायदा (एटीए) 1997 अंतर्गत अटक केले होते. सध्या सईद लाहोर येथील कोट लखपत कारागृहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District Collector Fraud : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला तोतयाने घातला २० लाखांचा गंडा, सत्य समोर येताच उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sainik Takli MIDC Controversy : सैनिक टाकळी एमआयडीसीचा वाद चिघळला! मंत्रालयातील बैठकांनंतरही संभ्रम कायम; आंदोलक अन् आमदार आमनेसामने

ललित प्रभाकर-प्राजक्ता माळीची जोडी 13 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार ; नव्या प्रोजेक्टची घोषणा, चाहते खूश

Latest Marathi News Live Update : कल्याणपुरीत किरकोळ वादातून एका व्यक्तीची भोसकून हत्या

Ankita Bhandari Murder मधील 'VIP' आरोपांवर सरकारचे स्पष्टीकरण; SIT तपासापासून कुटुंबाला मदतीपर्यंत काय झाले?

SCROLL FOR NEXT