Independence Day esakal
ग्लोबल

Independence Day : पाकिस्तानी संगीतकाराने वाजवले भारताचे राष्ट्रगीत

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या रबाब वादक सियाल खानने भारताचे राष्ट्रगीत वाजवतानाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

संगीताला देशाच्या सीमारेषाचे बंधन नसते. म्हणूनच भारताचे संगीत पाकिस्तानात आणि पाकिस्तानातले संगीत भारतात ऐकले जाते. हेच प्रेम व्यक्त करणारा एक व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पाकिस्तानी रबाब वादक सियाल खानने जन-गण-मन हे भारताचे राष्ट्रगीत वाजवून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाची भेट दिली आहे. हा व्हीडिओ इंटरनेटवर लोकांचे मन जिंकत आहे.

रबाब हे एक तंतू वाद्य आहे. हे वाद्य वीणेसारखे असते. हे वाद्य पाकिस्तान, अफगाणीस्तान व काश्मीरमध्ये फार लोकप्रिय आहे. व्हीडिओत सियाल खान यांच्या मागे शांत सुंदर पहाड व हिरवळ दिसत आहे. यात राष्ट्रगीताचे सूर फारच मोहक वाटत आहेत. पोस्ट खाली त्यांनी सीमेपार असणाऱ्या माझ्या दर्शकांसाठी भेट असे लिहिले आहे.

संगीतकाराने पुढे लिहिले आहे की, भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. मी शांती, सहिष्णूता व आपल्यात चांगले संबंध असून मैत्री व सद्भावनेच्या हेतूने भारताच्या राष्ट्रगीत वाजवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ट्वीटरवर याला आधीच ८ लाख पेक्षा अधिक व्हीव्यूज मिळाले आहेत. ५० हजाराच्या जवळ लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT