court sentenced Death to women because of whatsapp msg esakal
ग्लोबल

व्हॉट्सअ‍ॅपवरील एक मॅसेज अन् कोर्टाने महिलेला सुनावली फाशीची शिक्षा!

एका महिलेनं आपल्या मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) रागाच्या भरात एक वादग्रस्त मॅसेज (Controversial message) पाठवला. त्यामुळे कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अलीकडे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यातही व्हॉट्सअ‍ॅप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. परंतु त्यामाध्यमातून बऱ्याचदा कळत नकळत चुकीचे मॅसेज पाठवले जातात आणि त्यातून अडचणी निर्माण होतात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) किंवा सोशल मीडियाचा (Social Media) वापर विचारपूर्वक आणि विवेकाने करायला हवा, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. पाकिस्तानमधील (Pakistan) एका महिलेने आपल्या मित्राला केलेल्या वादग्रस्त मॅसेजमुळे कोर्टाने (Court) तिला थेट फाशीची (Hanging) शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानमधील एका महिलेला ईशनिंदा केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या महिलेवर व्हॉट्सअ‍ॅपवर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. तसं पाहिलं तर हे प्रकरण तसं थोडे जुने आहे. परंतु या महिलेला तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि ती चर्चेत आली. या घटनेनंतर पाकिस्तानमधील ईशनिंदेचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

वास्तविक, ही घटना पाकिस्तानच्या रावळपिंडी न्यायालयाशी (Rawalpindi Court) संबंधित आहे. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार फारुख हसनत याच्या तक्रारीवरून न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला आहे. अनिका अतीक असे आरोपी महिलेचे नाव असून तिच्यावर तीन आरोप सिद्ध झाले आहेत. प्रेषित मुहम्मद यांचा अवमान, इस्लामचा अपमान आणि सायबर कायद्याचे उल्लंघन असे आरोप या महिलेवर करण्यात आले आहेत.

या महिलेने 2020 मध्ये तिचा एका मित्र फारुखला रागाच्या भरात ईशनिंदेने भरलेला संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेला होता. फारुखने अनिकाला मेसेज डिलीट करून माफी मागायला सांगितली, पण तिने तसं करायला नकार दिला. यानंतर फारुखने अनिकाविरोधात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी अनिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

यानंतर हे प्रकरण रावळपिंडी कोर्टात पोहोचले आणि त्यानंतर कोर्टाने बुधवारी महिलेला फाशीची शिक्षा सुनावली. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की फारुखने 2020 मध्येच अनिका अतीक विरोधात तक्रार दाखल केली होती. अनिका आणि फारुख यांची पूर्वी मैत्री होती. पण त्यांच्यात कशावरून तरी भांडण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईतील रेल्वेट्रॅक पाण्याखाली, पावसाने शहर ठप्प! घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा...

'मला त्याचा 'तो' भाग खूप आवडतो' अभिनेत्रीला नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट करणं पडलं महागात, नेटकरी म्हणाले, 'हेच का संस्कार'

Mumbai : शिकायला लंडनला जायचं होतं, त्याआधीच बिझनेसमनच्या १७ वर्षीय लेकीनं संपवलं आयुष्य; २३ मजली इमारतीवरून मारली उडी

Rule 72 Explained: तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट होणार? Rule No. 72 सांगतोय तुमचं आर्थिक भविष्य

Dahi Handi 2025 Celebration: गो गो गोविंदा...! दहीहंडी उत्साहात साजरी करण्यासाठी 'या' सेफ्टी टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT