ग्लोबल

मानवनिर्मित वस्तूचा पहिल्यांदाच सूर्याच्या वातावरणाला स्पर्श

या मोहिमेबद्दल जाणून घ्या सविस्तर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पृथ्वीवरुन मानवाला घेऊन अवकाशात झेपावणार पहिलं नियंत्रित, शास्वत आणि शक्तिशाली यंत्र अर्थात विमानाची निर्मिती राईट ब्रदर्सनी सन १९०३ केली होती. त्यानंतर शंभर वर्षांनी मानवानं आता सूर्याच्या अगदी जवळ पोहोचण्याचा पराक्रम केला आहे. पार्कर सोलर प्रोब हे नासाचं यान ही पहिली मानवनिर्मित वस्तू आहे जिनं सूर्याच्या वातावरणात प्रवेश केला आहे. सूर्याच्या वातावरणाला कोरोना (Corona) असं संबोधलं जात. फिजिकल रिव्ह्यू लेटर्स (Physical Review Letters) या संशोधन पत्रिकेत याबाबत अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

पार्कर सोल प्रोब (The Parker Solar Probe) सन २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी तारा असलेल्या सूर्याच्या रहस्यमय दुनियेचा उलगडा करण्यासाठी हे यान सज्ज झालं होतं. या यानानं २८ एप्रिल रोजी सूर्याच्या कोरोनात (वातावरण) यशस्वीरित्या प्रवेश केला. सूर्याचं वातावरण उच्च तप्त असून त्याचं तापमान २ मिलियन (२० लाख) डिग्री फॅरेनहाईट इतकं आहे.

खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या सदस्यांसह शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या मोठ्या सहकार्यामुळे ऐतिहासिक क्षण गाठला गेला. हार्वर्ड आणि स्मिथसोनियन (CfA) यांनी या प्रोब यानाचं सोलर प्रोब कप तयार केला होता. हा कप सूर्याच्या वातावरणातील कण गोळा करतो याद्वारे शास्त्रज्ञांना खात्री पडली की अंतराळयान खरोखरच कोरोनामध्ये गेले आहे. या कपने गोळा केलेल्या डेटानुसार, २८ एप्रिलमध्ये प्रोब यानानं कोरोनामध्ये तीन वेळा प्रवेश केला. पाच तास ते या एका पॉईंटवर स्थिर राहिलं होतं.

या संपूर्ण मोहिमेबाबत माहिती देताना CfA चे खगोलभौतिकशास्त्रज्ञ मायकेल स्टीव्हन्स म्हणाले, "या संपूर्ण मोहिमेचं उद्दिष्ट सूर्य कसा कार्य करतो हे जाणून घेणं आहे. सौर वातावरणात उड्डाण करून आम्ही हे साध्य करू शकतो. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे अंतराळयानानं सूर्याच्या वातावरणाची बाह्य सीमा ओलांडणे. ज्याला शास्त्रज्ञ 'अल्फेन पॉइंट' असं म्हणतात. या मोहिमेचा एक मूलभूत भाग म्हणजे आपण हा बिंदू ओलांडला की नाही हे मोजण्यासाठी सक्षम असणे होय."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT