Pfizer Corona vaccine file photo
ग्लोबल

फायझर, अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस डेल्टा व्हेरिएन्टवर प्रभावी

कार्तिक पुजारी

लंडन- 2020 च्या सुरुवातीपासून जगावर कोरोना (corona) महामारीचं संकट घोंघावत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पण कोरोना विषाणू वारंवार आपलं रुप बदलत असल्याने समस्या कायम आहे. कोरोनाचे डेल्टा प्रारुप (Delta variant of coronavirus) अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जातंय. डेल्टा प्रारुप सर्वप्रथम भारतामध्ये आढळून आला होता. हे प्रारुप ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या अल्फा प्रारुपापेक्षा जास्त धोकादायक आहे. असे असले तरी फायझर आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीची लस डेल्टा प्रारुपाविरोधात संरक्षण पुरुवत असल्याचा दावा लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. (Pfizer AstraZeneca vaccines protect against Delta variant Lancet study)

पब्लिक हेल्थ स्कॉटलँड (Public Health Scotland ) आणि युनिव्हर्सिटी ऑफ इडिनबर्गच्या (University of Edinburgh) संशोधकांनी Pfizer-BioNTech लस डेल्टा प्रारुपाविरोधात चांगले संरक्षण पुरवत असल्याचं सांगितलं आहे. तसेच Oxford-AstraZeneca (भारतातील कोविशिल्ड) पेक्षा Pfizer-BioNTech ची लस डेल्टा प्रारुपाविरोधात अधिक प्रभावी असल्याचं संशोधकांना आढललं आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

1 एप्रिल ते 6 जूनदरम्यान संशोधकांनी 19,543 कोरोना रुग्णांवर अभ्यास केला. यात आढळून आलंय, की अल्फा प्रारुपाविरोधात फायझर लस 92 टक्के प्रभावी आहे, तर डेल्टा प्रारुपाविरोधात ही लस 79 टक्के प्रभावी आहे. अस्ट्राझेनेकाची लस अल्फा प्रारुपाविरोधात 73 टक्के संरक्षण पुरवते, तर डेल्टा प्रारुपाविरोधात 60 टक्के संरक्षण पुरवते. संशोधकांनी असंही सांगितलं की, एक डोसपेक्षा दोन लशीचे डोस डेल्टा प्रारुपाविरोधात जास्त संरक्षण पुरवतात. डेल्टा प्रारुपाच्या संदर्भात रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची शक्यता जास्त आहे. पण, Oxford-AstraZeneca आणि Pfizer-BioNTech या दोन्ही लशींमुळे डेल्टा प्रारुपाचा धोका कमी होत आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता की, डेल्टा प्रारुप संपूर्ण यूरोपमध्ये पसरु लागलाय. अनेक देशांनी कोरोना निर्बंधातून सूट दिली, त्यामुळे प्रारुपाला पसरण्यास वाव मिळाला आहे. त्यामुळे यूरोपात कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटवू नये. डेल्टा प्रारुप लसीपासून वाचण्यास सक्षम दिसत आहे. त्यामुळे 60 वर्षांपुढील व्यक्तीनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भारतामध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे निर्बंध शिथिल करणे धोक्याचे ठरु शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT