vaccine for child
vaccine for child 
ग्लोबल

आश्वासक! लहान मुलांसाठीही लवकरच येणार कोरोनाची लस; चाचणीस सुरुवात

सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेची औषध निर्मिती करणारी कंपनी फायझर कोरोना विरोधातील लढ्यासाठी लसनिर्मितीचे काम करत आहे. फायझरची कोरोना प्रतिबंधक लस सध्या बाजारात आहे. सध्या कुठल्याच कंपनीची कोरोना प्रतिबंधक लस मुलासांठी उपलब्ध झाली नाहीये. मात्र, आता फायझर कंपनीने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. फायझरने 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे परिक्षण करण्यास सुरवात केली आहे. कंपनीला अशी आशा आहे की, 2022 च्या सुरवातीलाच कोरोना प्रतिबंधक लस लहान मुलांसाठी देखील बाजारात उपलब्ध होईल. कोरोना महासंकटापासून वाचण्यासाठी फायझरसहित अनेक कंपन्यानी वयस्कर लोकांसाठीची लस बाजारात आणली आहे. तसेच या लसींच्या लसीकरणाची मोहिम देखील जोरदार गतीने सुरु आहे. 

फायझरच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की सुरवातीच्या टप्प्यातील ट्रायलसाठी पहिल्या व्हॉलेंटीअरला बुधवारी पहिले इंजेक्शन दिलं गेलं आहे. अमेरिकेमध्ये 16 वर्षे अथवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना फायझरची कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. अमेरिकेमध्ये बुधवारी सकाळपर्यंत 6.6 कोटी लोकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. 6 महिन्यांपर्यंतच्या मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीसाठी याच प्रकारची ट्रायल गेल्या आठवड्यात मॉडर्ना कंपनीने देखील सुरु केली आहे. 

लहान मुलासांठी कोरोना लसीला अद्याप मंजूरी नाही
अमेरिकेमध्ये केवळ फायझरची लस 16-17 वर्षांच्या मुलांना दिली जात आहे. तर मॉडर्नाच्या लसीला 18 वर्षे अथवा त्यावरील लोकांना देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. अद्यापतरी लहान मुलांना देण्यासाठी कोणत्याही कोरोना लसीला मंजूरी देण्यात आली नाहीये. फायझरने ही कोरोना लस लहान मुलांसाठी तीन टप्प्यांमध्ये देण्याचा विचार केला आहे. फायझरच्या या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये  एकूण 144 मुले सहभागी होत आहेत. यानंतरच्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 4500 मुलांना लस देण्याची योजना आहे. या दरम्यान कंपनी लहान मुलांमध्ये सुरक्षितता आणि परिणामकारकता या दोन निकषांच्या आधारे तपासणी करेल. कंपनीला अशी आशा आहे की, 2021 च्या पहिल्या 6 महिन्यांतच या ट्रायल पूर्ण होतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT