donkey sakal
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये वाढली गाढवांची संख्या, कारण ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल

दरवर्षी पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या झपाट्याने वाढत आहे

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानच्या 2021-2022 च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या एका अहवालात त्यांच्या देशातील गाढवांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या ५७ लाखांवर पोहोचली आहे. या अहवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

सर्वेक्षणात सांगितल्याप्रमाणे इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत त्यांची गाढवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानात 56 लाख गाढवे होती. आता ही संख्या 57 लाख झाली आहे. दरवर्षी येथे गाढवांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गाढवांची संख्या वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते उपजीविकेचे साधन आहे.

पाकिस्तानच्या ग्रामीण भागातील लोक त्यांच्या उत्पन्नाच्या ३५ ते ४० टक्के कमाई पशुपालन करून करतात. यामध्ये गाढवांचा वाटा सर्वाधिक आहे कारण पाकिस्तान हीच गाढवे चीनला चांगल्या किमतीत विकतो. चीनला गाढवे विकून पाकिस्तान चांगला नफा कमावतो. एका रिपोर्टनुसार, एका गाढवासाठी तिथे 18-20 हजार रुपये मिळतात. तर विशेष म्हणजे चीनमध्ये या गाढवांच्या त्वचेपासून औषधे बनवली जातात.

भारताबाबत बोलायचे झाले तर भारतात गाढवांची संख्या सातत्याने कमी होत आहे. भारतात त्यांची संख्या सुमारे 1.20 लाख आहे. गाढवांच्या संख्येमध्ये सातत्याने घट होत आहे, याचे एक कारण चीनच्या बाजारपेठेत गाढवाच्या कातडीला असलेली जास्त मागणी म्हणता येईल. भारतात गाढवाचे मांस खाल्ले जात नाही, त्यामुळे त्यांचे मांस येथे विकणे बेकायदेशीर आहे.

गाढवाच्या संख्येत टॉप 10 देश कोणते-

1.इथियोपिया- 8,778,750

2. पाकिस्तान- 5,200,000

3. चीन- 4,568,500

4. मेक्सिको- 3,283,017

5. चाड- 3,186,581

6. नाइज़र- 1,837,429

7. ईरान- 1,531,079

8. मिस्र- 1,493,369

9. अफ़गानिस्तान- 1,317,000

10. नाइजेरिया- 1,313,018

विशेष म्हणजे गाढवाच्या संख्येत भारताचा २५ वा क्रमांक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT