londan protest.jpg 
ग्लोबल

भारतातील शेतकरी कायद्याविरोधात लंडनमध्ये आंदोलन, मोठ्याप्रमाणात अटक

सकाळ ऑनलाईन टीम

लंडन- ब्रिटनमधील मध्य लंडन येथे रविवारी भारतीय उच्चायुक्त कार्यालया बाहेर भारतातील तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने यात आंदोलक सामील झाले होते. स्कॉटलँड पोलिसांनी मोठ्याप्रमाणात आंदोलकांना अटक केली आहे. आंदोलनापूर्वी स्कॉटलँड यार्डने भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर ब्रिटनच्या विविध ठिकाणाहून आलेल्या आंदोलनकर्त्यांना इशाराही दिला होता. दरम्यान, या आंदोलनात खलिस्तानी झेंडे फडकवण्यात आले. 

मध्य लंडनमध्ये 'आम्ही पंजाबी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत' असे बॅनर घेऊन आंदोलक रस्त्यावर उभे होते. पोलिसांनी या आंदोलकांना रोखले आणि कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून लागू केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला अटक केली जाईल तसेच त्यांच्याकडून दंडही घेतला जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. परंतु, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लंडनमध्ये सध्या 30 हून अधिक लोक जमा होऊ शकत नाहीत. 

जर निर्धारित 30 लोकांहून अधिक जण जमा होऊन निय मोडण्यात आला तर तो गुन्हा समजला जाईल आणि अशांविरोधात दंडात्मक कारवाई करुन अटक केली जाईल, असे मेट्रोपॉलिटन पोलिस कमांडर पॉल ब्रोगडेन यांनी म्हटले होते. त्यांनी नागरिकांना आंदोलनात सामील न होण्याचे आवाहन केले होते. 

या आंदोलनात प्रामुख्याने ब्रिटिशमधील शीख समुदायाचे नागरिक मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. या सर्वांच्या हातात मोदी सरकारविरोधी बॅनर होते. 'शेतकऱ्यांच्या न्यायासाठी' असा संदेश असलेले बॅनरही त्यांच्या हातात होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Rare Albino Snake : काळा नाहीतर चक्क पांढराशुभ्र! सिंधुदुर्गातील पावशीत आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'; गुळगुळीत शरीर अन्.. काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT