PUBG 
ग्लोबल

PUB G mobile 2 पुढच्या आठवड्यात होणार लॉन्च?; भारतात सुरु होण्याची शक्यता धूसर

सकाळ डिजिटल टीम

PUB G mobile 2 हा गेम पुढील आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. एका माहितीगारानं याबाबत माहिती देताना सांगितलं की, या नव्या गेममध्ये आधुनिक हत्यारं, नवा नकाशा आणि नव्या गॅजेट्सचा समावेश असणार आहे. मात्र, अद्याप हा गेम बनवणाऱ्या कंपनीने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.  यापूर्वीच्या PUB G mobile गेमला गेल्यावर्षी भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे याच्या पुढच्या गेमला परवानगी मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

आश्चर्यकारक! शार्कच्या पिलाच्या चेहऱ्याचं माणसाच्या चेहऱ्याशी साम्य

 PlayerIGN नावाने ट्विटर हँडल चालवणाऱ्या एका व्यक्तीनं दावा केला आहे की, PUBG Mobile 2 हा गेम पुढील हप्त्यात लॉन्च होऊ शकतो. सध्या हटवण्यात आलेल्या एका Webo पोस्टचा हवाला देताना या व्यक्तीनं हे देखील सांगितलं आहे की, हा नवा गेम सन २०५१ वर आधारित असणार आहे. यामध्ये आत्याधुनिक हत्यारं, गॅजेट्स आणि एक नवा नकाशा असणार आहे. हा गेम अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर असंही सांगितलं जात आहे की, Krafton या दक्षिण कोरियन कंपनीद्वारे हा नवा गेम विकसित करण्यात आला आहे. ही कंपनी Global Invitational 2021 स्पर्धेत या गेमची घोषणा करण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा पुढील आठवड्यात होणार आहे. 

याच माहितीगारानं जानेवारी महिन्यात एक कोरियन वृत्त शेअर केलं होतं ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, PUB G 2 (पीसी व कन्सोल) आणि PUB G mobile 2 विकसित करण्यात येत आहे. 


PUB G mobile या गेमवर भारतात सप्टेंबर २०२० मध्ये ११७ चीनी अॅप्ससोबत बंदी घालण्यात आली होती. यानंतर हा गेम गुगल प्ले आणि अॅप स्टोअरवरुनही हटवण्यात आला होता. चीनी कंपनी Tencent वर या गेमच्या लॉन्चिंगची जबाबदारी होती. त्यामुळे या गेमवरुन गोपनीयता आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत सरकारने बंदी घातली होती. तेव्हापासून पबजी कॉर्पोरेशनची सहाय्यक कंपनी Krafton या गेमला भारतात पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने PUB G mobile india या गेमची घोषणा केली होती. तसेच लवकरच हा गेम लॉन्च केला जाईल असं ट्विट केलं होतं. मात्र, अद्यापपर्यंत हा गेम लॉन्च झालेला नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT