joe biden 
ग्लोबल

राफेलपेक्षाही शक्तीशाली फायटर जेट भारताच्या ताफ्यात येणार; बायडेन सरकारची मंजुरी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेलसारखे शक्तीशाली राफेल फायटर जेट सामिल झाले आहे. या जेटशिवाय ११४ मीडियम फायटर जेट्स खरेदी करण्याबाबतही विचार सुरु आहे. त्यातच अमेरिकीच्या बायडेन प्रशासनाकडून एअरक्राफ्ट बनवणाऱ्या बोईंगला भारतात फाइटर जेट एफ-15EX च्या विक्रीला मंजुरी मिळाली आहे. या शर्तीमध्ये सध्या ७ फायटर जेट्स कंपन्यांचा समावेश असून हा करार २० ते ३० अब्ज डॉलरचा असण्याची शक्यता आहे. 

देशातील सर्वांत युवा महिला पायलट; काश्मीरच्या आयशा अजीजचं नेत्रदिपक यश

एफ-15EX एक शक्तीशाली जेट असून फ्रान्सने भारताला दिलेल्या ते राफेल जेटला पर्यायी ठरु शकते. त्यामुळे एफ-15EX भारताच्या ताफ्यात सामिल झाल्यास आपली ताकद दुपटीने वाढणार आहे. असे असले तरी भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार बोईंगकडून फायटर जेटसंबंधी माहिती मिळायची असून त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल. 

भारताने फायटर जेट खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. जगातील सात कंपन्यांनी यात रस दाखवला आहे. बोईंगसोबत  लॉकहीड मार्टिनचे सिंगल सीटर एफ-21, साब कंपनीचे सिंगल इंजीनचे ग्रिपेन, ट्विन इंजीनचे राफेल, यूरोफाइटरचे ट्विन इंजीनचे टायफून आणि रशियाचे ट्विन इंजीनचे फाइटर जेट आरएसी मिग-35 आणि सुखोई-35 सारख्या जेट्सचा समावेश होतो. 

सांगितलं जातंय की, बोईंग F-15EX भारतीय वायुदलाला देण्यात येईल, तर नौसेनेला सुपर हॉर्नेट देण्यात येईल. नौसेनेकडून एअरक्राफ्ट कॅरियर्ससाठी ५७ फायटरच्या खरेदीचा प्रस्ताव पुढे करण्यात येईल. अमेरिकी लष्कर सुपर हॉर्नेटला केवळ नौसेनेसाठी वापरते आणि जेट एअरक्राफ्ट कॅरियर्सवर तैनात असतात. अमेरिकेला आजही एफ-१५ वर पूर्ण विश्वास आहे. जूलै २०२० मध्ये बोईंगला २३ अब्ज डॉलरचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. याअंतर्गत बोईंगला एफ-१५ चे लेटेस्ट वर्जन एफ-१५ इगलला तयार करायचे होते. 

इस्ज्ञायलजवळ आहे जेट

एफ-१५ इगल सध्या इस्त्रायलकडे आहे. हे जेट एअर टू एअर कॉम्बॅक्टमध्ये निपूण आहे. मोठ्या युद्धासाठी हे फायटर जेट पूर्णपणे सक्षम आहेत. एफ-१५ ला जगातील सर्वात शक्तशाली जेट मानलं जातं. एफ-१५ इगल मॅक २.५ म्हणजे ३०८७ किलोमीटर प्रती तासाच्या गतीने उडू शकते. याची शस्त्र घेऊन जाण्याची क्षमता राफेल आणि सुखोईपेक्षा जास्त आहे. याची रेंज २२०० किलोमीटरची आहे. एका एफ-१५ इगलची किंमत ८०.३ मिलियन डॉलर आहे. भारताची मागणी आहेत, की हे जेट भारतातच बनवले जावे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT