ग्लोबल

गाझावरील हवाई हल्ल्यात लहान मुलांसहित 10 पॅलेस्टिनी ठार

सकाळ डिजिटल टीम

गाझा सिटी: इस्राईल आणि पॅलेस्टाइन (israel palestine conflict) यांच्यातील संघर्ष कायम असून शनिवारी सकाळी इस्रायली विमानांनी गाझा शहरावर केलेल्‍या हवाई हल्ल्यात दहा पॅलेस्टिनींचा मारले गेले. यात मुख्यत्वे लहान मुलांचा समावेश आहे. गाझामधील (Gaza) हमासचे (Hamas) दहशतवादी आणि इस्राईलमध्ये गेल्या आठवड्यांपासून सशस्त्र संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत यात अनेकजण मारले गेले आहेत. यामुळे शस्त्रसंधी करण्यासाठी दोन्ही बाजूंवर दबाव येत असला तरी दररोज हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. जेरुसलेम येथे प्रथम सुरू झालेल्या हिंसाचाराचे हे लोण पूर्ण प्रांतात पसरले आहे. ज्यू व अरबांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष सुरू असून दंगलही होत आहे. वेस्ट बँक येथे पॅलेस्टाईन नागरिकांनी काल निदर्शनेही केली. तेथे इस्राईलने ११ जणांना ठार केले होते. (Israeli airstrike on a house in Gaza City reportedly killed at least Ten Palestinians)

दरम्यान, इस्राईलने माध्यमांचा वापर करीत हमासच्या दहशतवाद्यांना त्यांच्या जाळ्यात अडकून अनेकांचा खातमा केल्याचे सांगितले जात आहे. पॅलेस्टाईनबरोबर सुरू असलेल्या या लढ्यात इस्राईल हमास या दहशतवादी संघटनेवर बाँबफेक करीत आहे. इस्रायली पत्रकारांच्या दाव्यानुसार इस्राईलचे सैन्याने माध्यमांचा वापर करीत हमासला लक्ष्‍य केले आहे. इस्राईलचे हवाई दल आणि पायदळ गाझा पट्टीत हल्ला करीत असल्याची माहिती पत्रकारांना दिल्यानंतर गाझातील भूभागावर इस्राईलने हल्ला केल्याची अफवा पसरली होती. मात्र काही तासांतच गाझाच्या अंतर्गत भागात इस्राईलचा एकही सैनिक नसल्याचा खुलासा त्यांच्या सैन्याने केला.

संघर्ष थांबविण्यासाठी ‘यूएन’ची मध्यस्ती

संयुक्त राष्ट्राचे (यूएन) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी इस्राईल आणि गाझामधील हा संघर्ष तातडीने थांबविण्याचे आवाहन शुक्रवारी (ता.१४) केले. ‘यूएन’चे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी ही माहिती दिली. हा संघर्ष थांबविला गेला नाही तर केवळ पॅलेस्टाईन आणि इस्राईलच नाही तर या देशांच्या आसपासच्या भागातही सुरक्षा मानवीय दृष्टिकोनातून भयानक संकट उत्पन्न होऊ शकते, ज्यामुळे कट्टरतावादाला आणखी प्रोत्साहन मिळेल, असा इशारा त्यांनी दिला. या संघर्ष समाप्त करण्यासाठी ‘यूएन’ मध्यस्ती करण्यास सक्रिय असून अमेरिका, युरोपीय समुदाय आणि रशियाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन गुटेरस यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT