ग्लोबल

BREAKING : कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला

नामदेव कुंभार

Rockets hit Kandahar airport in Afghanistan : अफगाणिस्तानमधील कंधार विमानतळावर रॉकाट हल्ला झाला आहे. AFP ने विमानतळाच्या हवाल्यानं हे वृत्त दिले आहे. या हल्ल्याबाबत अद्याप आणखी कोणतीही माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेला असेल. या हल्ल्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला अथवा विमानतळाचं किती नुकसान झालं. याची कोणताही माहिती समोर आलेली नाही. दक्षिण अफगाणिस्तानमध्ये तीन रॉकेट हल्ले झाले आहेत. तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये आपले हल्ले केले आहेत. कंधार विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे सध्या सर्व सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती विमानतळ प्रमुख मसूद पश्तून यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरु आहे. गेल्या आठवड्यात ताकहार प्रांताची राजधानी तालुकानवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र, अफगाण सैन्यांनी हा हल्ला हाणून पाडला होता. यामध्ये जवळपास 28 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

अमेरिकेचे सैन्य ऑगस्टच्या अखेरीस अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. त्याआधी तालिबानचा जास्तीत जास्त प्रदेशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. यातूनच, वेगवेगळ्या दिशांनी हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT