सध्या युक्रेन आणि रशियादरम्यानचा तणाव वाढतच चालला आहे. युक्रेनची राजधानी कीव पर्यंत रशियन सैनिक घुसले असल्याचं ताज्या रिपोर्टनुसार समजतंय. आता रशियाचं पुढचं पाऊल काय असेल याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमार पुतीन यांचं आयुष्यही असंच मनोरंजक आहे. जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी.
त्यांचा जन्म १९५२ मध्ये झाला. त्यांना पहिलाच राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांनी शिक्षण झाल्यावर रशियाच्या गुप्तचर यंत्रणासाठी काम सुरु केलं. त्यांनी एकापाठोपाठ एक यशस्वी कामं करुन लेफ्टनंट जनरल पर्यंत पर्यंत मजल मारली. (Russia President Vladimir Putin Biography)
त्यानंतर १९९१ मध्ये जेव्हा सेव्हियत रशियनचे तुकडे झाले त्यानंतर रशियाचे तात्कालीन राष्ट्राध्यक्ष मिखाइल गोर्बाचोव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यानंतर त्यांनी या नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. हळूहळू त्यांनी राजकारणात आपलं वर्चस्व स्थापन केलं. त्यानंतर १९९९ मध्ये तात्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन यांच्या राजीनाम्यानंतर व्लादिमार पुतीन यांचं नाव समोर आलं. त्यानंर त्यांनी राष्ट्रपती पदाची गादी संभाळली. सामाजिक, आर्थिक कामं करता करता त्यांनी स्वत:ला रशियाचा 'गॉडफादर' बनवून ठेवलं.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमार पुतीन यांनी सेव्हियत रशियाला परत जोडण्याची शपथ घेतली आहे, अशा चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात रंगल्या. त्यानंतर २०१३-१४ मध्ये रशियाने क्रिमीयावर हल्ला करुन तो भाग ताब्यात घेतला. नाटो संस्था युक्रेन आणि क्रिमियाला आपल्या वर्चस्वाखाली घेण्यासाठी प्रयत्न करत होती. पण रशियाने क्रिमियाला ताब्यात घेतल्यावर हे प्रकरण थंड पडलं.
कसं आहे पुतीन यांचं वैयक्तिक आयुष्य?
पुतीन हे वैयक्तिक जीवनाविषयी खूप साकारात्मक आहेत. त्यांचे कुटुंबीय हे प्रसिद्धीपासून दूर असल्याचं समजतंय. पुतीन यांचा त्यांच्या पत्नीबरोबर घटस्फोट झाला असून त्यांना दोन मुली आहेत. घटस्फोटाची माहीती त्यांनी स्वत: एका मुलाखतीत दिली होती. मारिया वोरोनत्सोवा आणि कैटरीना तिखोनोवा असं त्यांच्या दोन मुलींची नावं आहेत. त्यांच्याविषयी माध्यमांमध्ये जास्त माहीती उपलब्ध नाही.
फिटनेस आणि खेळाचे छंद
पुतीन हे आपल्या फिटनेससंदर्भात सुद्धा ओळखले जातात. सध्या ते ६९ वर्षाचे असूनसुद्धा सुदृढ दिसतात. घोडेस्वारी, शुटींग आणि सायबेरियाच्या कडक उन्हात पोहताना त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यांना बर्फावरील हॉकी आणि जुदो कराटे याचापण छंद आहे. कराटेमध्ये त्यांना ब्लॅक बेल्टपण मिळाला आहे.
भव्य आणि अलिशान जीवनशैली
रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या भव्य जीवनशैलीसाठी ओळखले जातात. क्रेमलिनच्या रिपोर्टनुसार पुतीन यांना दरवर्षी ११७,००० अमेरिकी डॉलर पगाराच्या स्वरुपात मिळतात. पुतीन हे साधारण 200 अब्ज डॉलरचे मालक असल्याचा दावा बिल ब्रॉउडर यांना केला आहे. त्याचबरोबर त्यांचे समुद्रकिनारी बंगले आणि इतर मालमत्ता पण आहे. रशियाचे विरोधीपक्षनेते एलेस्की नवालनी यांनी दावा केला की, हा अलिशान बंगला त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी बनवला गेला आहे. सतरा हजार Sq Mtr मध्ये पसरलेल्या या अलिशान बंगल्याची किंमत साधारण १ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. या बंगल्यात जीम, स्विमिंग पूल, सिनेमागृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कडक सुरक्षाही तैनात आहे.
१५ हेलिकॉप्टर, ४ जहाजं, अलिशान गाड्या आणि सोन्याचं टॉयलेट
रशियाच्या विरोधीपक्षाचे नेते बोरिस नेमस्तोव यांच्या आत्महत्येच्या आधी त्यांनी पुतीन यांच्यावर अनेक दावे केले होते. त्यात त्यांनी पुतीन यांच्याकडे १५ हेलिकॉप्टर, ४ जहाजं, अनेक अलिशान गाड्या आणि एक वैयक्तिक जेट विमान आहे. ज्यामध्ये सोन्याचं टॉयलेट असल्याचा दावा केला होता.
त्याचबरोबर ते महागड्या घड्याळांसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे एकापेक्षा एक महागडे घड्याळ आहेत. त्या घड्याळांची किंमत अंदाजे ६८७,००० अमेरिकन डॉलर इतकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.