Ukraine and Russia War Updates
Ukraine and Russia War Updates Sakal
ग्लोबल

Russia Ukraine War: अहमदनगरचे 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले! पालक चिंतातूर

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War: खूप दिवसांच्या तणावानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये आज युद्धाची ठिणगी पडली. रशियानं युक्रेनची राजधानी किवसह (Kyiv) इतर शहरांमध्ये बॉम्बहल्ले केले आहेत. तसेच रशियाची काही लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. दरम्यान या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरमधील तब्बल 30-40 विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर येत आहे. (40 Ahmednagar students stranded in Ukraine! Parents worried)

अहमदनगरमधील अनेक विद्यार्थी युक्रेनमधील विविध राज्यांतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. यामध्ये खासकरून एमबीबीएसच्या (MBBS) विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यामुळे यातील 30-40 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यापैकी काही विद्यार्थी आज मायदेशी परतणार होते. परंतु बॉम्बहल्ल्यांमुळे विमानतळं बंद झाल्यामुळे त्यांना परतता आलं नाही. त्यांची विमानं रद्द झाल्याचं कळल्यानंतर संबंधित विद्यापीठांनी बसद्वारे पुन्हा विद्यापीठात परत नेले असून तेथे त्यांची सोय केली आहे.

तेथील लोक त्यांना सहकार्य करत असून जेवण वगैरे दिलं जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी फोनवरून आपल्या पालकांना दिली आहे. परंतु त्याचवेळी जवळपासच्या भागामध्ये हल्ले होत असल्याचंही या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितले आहे. आपली मुलं अडकल्यामुळे पालक चिंतातूर असून लवकरात लवकर त्यांना मायदेशी परत आणण्याची मागणी त्यांनी सरकारला केली आहे.

युक्रेन आणि रशियाचा वाढता तणाव पाहता भारत सरकारने युक्रेनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे परत येण्याचं आवाहन केलं होते. गेल्या दोन दिवसांत ही परिस्थिती जास्त चिघळली. त्यानंतर काल सुमारे 200 हून अधिक नागरिकांना मायदेशी आणले गेले. आजही एअर इंडियाचं विमान युक्रेनला रवाना झाला होता. परंतु रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे विमानतळ बंद केल्यामुळे या विमानाला अर्ध्यातूनच माघारी परतावं लागले. यामुळे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT