Beer Bomb  Sakal
ग्लोबल

देशप्रेमाची झिंग! युक्रेनमध्ये बिअर कंपनीकडून पेट्रोल बॉम्बची निर्मिती

रशियाच्या सैन्याशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यासह अनेक नागरिकांनीदेखील पुढाकार घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War : रशियन सैन्याचा मुकाबला करण्यासाठी युक्रेन सरकारने देशातील जनतेला मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्ब (Molotov cocktail Petrol Bomb) बनवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत युक्रेनमधील एका बिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बिअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे. (Ukraine Beer Company Making Molotov cocktail Petrol Bomb)

रशियाच्या सैन्याशी युक्रेनच्या सैन्यासह अनेक नागरिकांनीदेखील पुढाकार घेतला असून, आता यामध्ये बिअर उत्पादन कंपनीनेदेखील पुढाकार घेतला आहे. ल्विव्ह हे युक्रेनमधील एक ऐतिहासिक शहर असून रशियन सैन्य या शहरावर हल्ला करून ते नष्ट करू शकते, अशी भीती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रशियन सैन्याला तोंड देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे.

तत्पूर्वी, रशियाविरोधात लढण्यास (Ukraine Russia War) तयार असल्यास युक्रेनमधील कैद्यांची (Ukraine prisoners) तुरुंगातून सुटका करण्यात येईल, अशी थेट ऑफरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी कैद्यांना दिल्याचे वृत्त रॉयटर्सने प्रकाशित केले आहे.

चर्चेतून आणि शांततेने मार्ग काढावा

रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर अद्यापपर्यंत तरी तोडगा निघालेला नाही. दरम्यान, चर्चेतून आणि शांततेच्या मार्गातून दोन्ही देशांनी यावर मार्ग काढावा, असा सल्ला भारतासह अनेक देशांनी युक्रेन आणि रशियाला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT