Russia Ukraine war soldier married on battle field  esakal
ग्लोबल

युक्रेनच्या जवानांनी युद्धभूमीवरच उडवून दिला लग्नाचा बार

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात गेल्या 11 दिवसांपासून तुंबळ युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर चारी बाजूंनी हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील सर्व शहरात गोळीबार आणि बॉम्ब शेलिंग सुरू झाले आहे. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात रविवारी युक्रेनच्या जवानाने (Ukraine soldiers) आपली लग्नगाठ (Marriage) बांधली. सध्या या युद्धभूमीवरच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

कीव्ह पोस्ट (Kyivpost) या ट्विटर हँडलवरून या लग्नाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. लेसा आणि व्हालेरिय या 112 ब्रिगेड सीमा सुरक्षा दलातील दोघांनी लग्नगाठ बांधली. कीव्ह पोस्टने या दोघांच्या लग्नाचा फोटो शेअर करत त्याला 'आज युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू असताना सीमा सुरक्षा दलातील 112 ब्रिगेडच्या लेसा आणि व्हालेरिय यांनी लग्न केले. लष्करातील एका धर्मगुरूने त्यांचे लग्न लावून दिले.' असे कॅप्शन दिले.

काही दिवसांपूर्वीच युक्रेनमधील ओडेसा येथील जोडपे क्लेव्हेट्स आणि नतालिया व्लादिस्लेव्ह यांनी बॉम्ब शेल्टरमध्ये लग्न केले होते. याबाबतचे काही फोटो बेलारूसच्या माध्यमांमध्ये झळकले होते. दरम्यान, रशियाने व्हिनेत्सिया विमानतळ बेचिराख करून टाकले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी इतर देशांकडे युक्रेनला नो फ्लाईंग झोन घोषित करण्याची मागणी केली आहे. नाटोने हा प्रस्ताव नाकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT