Russia Ukraine War vladimir Putins adviser Anatoly Chubais resigns over war with Ukraine  
ग्लोबल

युध्दाच्या विरोधात पुतिन यांच्या सल्लागाराचा राजीनामा; सोडला देश

सकाळ डिजिटल टीम

मागच्या काही दिवसांपासून रशिया युक्रेन यांच्यामध्ये युध्द सुरू असून रशियावर अनेक पाश्चमात्य देशांनी निर्बंध लादले आहेत. यातच रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) केलेल्या अक्रमाणानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धाला विरोध दर्शवत रशियन हवामान दूत असलेल्या अनातोली चुबैस (Anatoly Chubais) यांनी राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी देश देखील सोडला आहे. तज्ञांच्या माहितीनुसार हे युक्रेनवरील आक्रमनानंतर रशियाशी संबंध तोडणारे सर्वोच्च-स्तरीय अधिकारी ठरले आहेत.

अनातोली हे 1990 च्या दशकातील रशियन आर्थिक सुधारकांपैकी एक आहेत जे पुतीन यांच्या सरकारमध्ये राहिले आणि त्यांनी पाश्चात्य अधिकार्‍यांशी जवळचे संबंध ठेवले. रशियाच्या 1990 च्या दशकाच्या खाजगीकरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, चुबैस यांनी 1990 च्या मध्यात पुतिन यांना त्यांची क्रेमलिनमधील पहिली नोकरी दिली. पुतिन यांच्या नेतृत्वाखाली चुबैस यांनी गेल्या वर्षी शाश्वत विकासासाठीचे दूत म्हणून नियुक्ती होईपर्यंत मोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले.

रशियाच्या आक्रमणानंतर रशियन सरकारवर देशांतर्गत टीकाकारांचा दबाव वाढवला आहे. यातच पुतिन यांनी 16 मार्च रोजी इशारा दिला होता की ते रशियाला "घोटाळे आणि देशद्रोही" यांच्यापासून मुक्त करतील. दरम्यान मागच्या आठवड्यात दिमित्री मेदवेदेवचे यांचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार राहिलेल्या अर्काडी दोरकोविच यांनी युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा निषेध केल्यानंतर रशियन सरकारच्या स्कोल्कोव्हो टेक्नॉलॉजी फंडचे प्रमुख म्हणून पद सोडले होते. युक्रेन युद्धाविरुद्ध बोलणाऱ्या काही माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी अर्केडी हे एक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT