Saudi Arabia to cut oil output by 1 million barrels a day in July
Saudi Arabia to cut oil output by 1 million barrels a day in July Sakal
ग्लोबल

OPEC: मोदींच्या खास मित्रामुळे भारताला मोठा झटका, वाढू शकतात पेट्रोल-डिझेलचे दर

राहुल शेळके

Saudi Arabia Oil Production: सौदी अरेबियाने रविवारी जाहीर केले की दररोज एक दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करेल. सौदी अरेबिया आणि रशियाच्या नेतृत्वाखालील 10 भागीदारांच्या नेतृत्वाखालील क्रूड एक्सपोर्ट कंट्रीज (OPEC) च्या 13 सदस्यीय संघटनेच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

तज्ञांचे म्हणणे आहे की, मोठ्या प्रमाणात OPEC+ देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादनाबाबतचे सध्याचे धोरण कायम ठेवणे अपेक्षित होते.

मात्र कपातीचा निर्णय धक्कादायक आहे. या निर्णयानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढती. त्यामुळे भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. (Saudi Arabia to cut oil output by 1 million barrels a day in July)

काय होता निर्णय?

सौदी अरेबिया 2024 पर्यंत प्रतिदिन 500 हजार बॅरल कपात वाढवेल. सौदी अरेबिया दररोज अतिरिक्त दहा लाख बॅरल कपात करेल. इराक 2024 पर्यंत प्रतिदिन 211 हजार बॅरल कपात करेल.

एप्रिलच्या सुरुवातीला, अनेक OPEC+ सदस्यांनी उत्पादनात एक दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त कपात करण्याचे मान्य केले. त्यामुळे भारतासारख्या कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांसाठी डोकेदुखी वाढणार आहे. (Petrol and Diesel Rate) 

कारण क्रूड स्वस्त झाल्यानंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, यूएई उत्पादन कपातीच्या पद्धतीत बदल करण्यावर जोर देत आहे. रशियाने केलेल्या युक्रेनवरील आक्रमणामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना धक्का बसला आहे.

एकेकाळी आशियाई तेल बाजाराचा बादशहा असलेल्या सौदी अरेबियाला आता रशियामुळे या बाजारपेठेत मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून, पाश्चात्य निर्बंधांमुळे रशिया भारत आणि चीनला सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात तेल विकत आहे.

रशिया अगोदर सौदी पूर्वी भारताचा मोठा तेल पुरवठादार होता, पण आता रशिया भारताचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे.

चीनचीही तीच स्थिती आहे आणि जगात रशिया तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे. आशियाई बाजारपेठेतील आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी सौदी अनेक पावले उचलत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT