seagull gulps down a whole rabbit alive video viral 
ग्लोबल

Video: एका घासातच गिळला जीवंत ससा...

वृत्तसंस्था

लंडन: एका सीगल पक्षाने जीवंत ससा एका घासामध्ये गिळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहात असून, आश्चर्याचा धक्का बसत आहे.

जगंलामधील विविध व्हिडिओ डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफीसारख्या चॅनलवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सीगल पक्षी सशाची शिकार करतो. हा पक्षी आपल्या चोचीने सशाला जिवंत पकडतो आणि पुढच्या क्षणाला तो हा ससा एका फटक्यात जिवंत गिळतो. संबंधित व्हिडिओ वेल्सजवळ असणाऱ्या पेम्ब्रुशजवळच्या स्कोमर बेटांवरील असल्याचे सांगितले जात आहे. ज्या पर्यावरण प्रेमींनी हा व्हिडिओ शूट केला त्यांना हा पक्षी सशाला निवांत खाईल, असे वाटले होते. मात्र, या पक्षाने एका घासात संपूर्ण ससा जिवंत गिळल्याचे पाहून पाहणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे, असे वृत्त डेली मेलने दिले आहे.

स्कोमर बेटांवरील वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ साऊथ अ‍ॅण्ड वेस्ट वेल्सवर आहे. ससे हे सीगल पक्षांचे प्रमुख खाद्य आहे. 'ससे हे या पक्षांच्या अन्नाचा प्रमुख भाग आहेत. जेव्हा इतर काहीही उपलब्ध नसते तेव्हा हे पक्षी सशांवर आपले पोट भरतात,' असे ट्रस्टच्या कर्मचाऱयांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DULEEP TROPHY FINAL: रजत पाटीदारने कसला भारी कॅच घेतला; संजू सॅमसनच्या भीडूने कमाल केली, संपूर्ण संघ १४९ धावांवर गुंडाळला

Latest Marathi News Updates : राज्यात तब्बल ३५ हजार कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

India US Relations: ट्रम्प मोदी मैत्रीच्या हातमिळवणीने भारतअमेरिका संबंधात नवे सौहार्द निर्माण होण्याची चिन्हे

घराला कुलूप लावून बाहेर जात असतानाच महिलेला भररस्त्यात चाकूने भोसकले; दिरावर खुनाचा आरोप, मंगळवार पेठेत नेमके काय घडले?

किरण मानेची वादग्रस्त पोस्ट व्हायरल; एबीव्हीपीची कारवाईची मागणी, पोस्टमध्ये म्हणाले...'भक्तडुक्कर पिलावळींनो...'

SCROLL FOR NEXT