Selfie 
ग्लोबल

भारतीयांमध्ये सेल्फीचे वेड; इतर देशांमधील सवयी

पीटीआय

वॉशिंग्टन - मोबाईलमधून सेल्फी काढणे आणि ती लगेचच इतरांना ‘शेअर’ करणे हा भारतीय महिलांच्या आयुष्याचा मोठा भाग बनला असून त्याचा त्यांच्या वर्तणुकीवर आणि आर्थिक व्यवहारांवरही परिणामही होऊ लागला असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणात आढळून आला आहे. सेल्फी काढून विविध ॲपच्या साह्याने त्यात बदल करण्याचा प्रकारही भारत आणि अमेरिकेत लोकप्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. 

जागतिक पातळीवर घेतलेल्या या सर्वेक्षणानुसार, कॅमेरा ॲपमधील फिल्टरचा लहान मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत भारतीय पालक फारसे काळजी करत नसल्याचे दिसून आले आहे. जर्मनीत मात्र पालक याबाबत सजग असतात. 

सेल्फीसह कोणत्याही छायाचित्राला अधिक चांगले रुप देण्यासाठी फिल्टरचा वापर दक्षिण कोरियात सर्रास केला जातो. सेल्फी क्लिक करण्यात आणि शेअर करण्यात भारतीय पटाईत असून फिल्टरचा वापर करून आपण स्वत:ला जगासमोर अधिक सुंदर स्वरुपात दाखवू शकतो, असे त्यांना वाटते. विशेषत: भारतीय महिला स्वत:ची छबी अधिक सुंदर करण्याकरता फिल्टरचा वापर करण्यास अधिक उत्साही असतात. मनासारखे छायाचित्र तयार करण्यासाठी त्या अनेक प्रकारच्या ॲपचा वापर करतात. या सवयीचा काही भारतीय महिलांच्या वर्तणुकीवर परिणाम होत असून पैसाही खर्च होत आहे. एखादा ड्रेस परिधान करून सेल्फी काढल्यास पुन्हा त्याच ड्रेसवर सेल्फी काढण्यास अनेक महिला तयार नसतात आणि त्या नवीन कपडे खरेदी करतात, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीयांबाबत काही निष्कर्ष
७० टक्के छायाचित्रे अँड्रॉइड मोबाईलच्या फ्रंट कॅमेराद्वारे
लहान मुलांकडून कॅमेराॲपचा अतिवापर होत असला तरी दुर्लक्ष
ॲपच्या अतिवापरापेक्षा मुलांकडून स्मार्टफोनचे नुकसान     होऊ नये याची काळजी
मोबाईलच्या कॅमेराचा दर्जा ही महत्त्वाची बाब

इतर देशांमधील सवयी 
अमेरिकेत फोटो एडिटिंगला अधिक महत्त्व
जर्मनीत लहान मुलांकडून सोशल मीडियाचा अधिक वापर
मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर प्रसिद्ध होण्यास जर्मनीच्या पालकांचा विरोध
दक्षिण कोरियात फिल्टरचा सर्रास वापर

या ॲपचा सर्रास वापर
पिक्स आर्ट, मेकअप प्लस, स्नॅपचॅट

या फिल्टरचा अधिक वापर
ब्राइटनिंग बॅकग्राऊंड, लाइटनिंग स्कीन टोन, मेकअप

पुरुषांनाही सवय
सर्वेक्षणानुसार, भारतीय पुरुषांमध्येही सेल्फीचे वेड आहे. मात्र, ते स्वत:च्या प्रतिमेऐवजी एखाद्या ठिकाणाच्या पार्श्वभूमीवर, घटनेच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढण्यास अधिक पसंती देतात, असे आढळून आले आहे.  नैसर्गिक दिसण्याला महत्त्व दिले जात असले तरी ‘नैसर्गिक’च्या व्याख्येत चेहऱ्यातील थोडे फार बदल त्यांना मान्य असतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT