Earthquake In Iran esakal
ग्लोबल

Earthquake Iran : भूकंपानं इराणची धरती हादरली; सात जणांचा मृत्यू, तब्बल 440 जण जखमी

भूकंपामुळं इराणच्या प्रांतीय राजधानीत अनेक घरांचं नुकसान झालंय.

सकाळ डिजिटल टीम

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 एवढी होती आणि त्याचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता.

तेहरान : तुर्की-इराण सीमेजवळील (Turkey-Iran Border) वायव्य इराणच्या पश्चिम अझरबैजान (West Azerbaijan) प्रांतातील खोय शहराला शनिवारी रात्री 5.9 तीव्रतेच्या भूकंपाचा (Earthquake In Iran) धक्का बसला.

रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळं इराणच्या प्रांतीय राजधानीत अनेक घरांचं नुकसान झालंय. इराणी मीडिया आणि युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्रानं (EMSC) याबाबत माहिती दिलीये. मात्र, इराणच्या IRNA या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

रॉयटर्सनं आपत्कालीन सेवा अधिकार्‍यांच्या हवाल्यानं सांगितलं की, अझरबैजान प्रांतातील खोय शहरात झालेल्या भूकंपात सात जणांचा मृत्यू झाला असून 440 जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळं खोय शहरातील काही इमारतींचं नुकसान झालं, असं फार्स वृत्तसंस्थेनं सांगितलं.

EMSC नं सांगितलं की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 एवढी होती आणि त्याचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता. इराणी मीडियानं (Iranian Media) इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगितलं की, भूकंपग्रस्त भागात बचाव पथकं पाठवण्यात आली आहेत, तर रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT